Sanguem IIT Dainik Gomantak
गोवा

IIT Goa : सांगेतील 'ही' जमीन सरकारचीच, विरोध केवळ राजकीय

आयआयटीला होणारा विरोध हा केवळ राजकीय असून आता त्याला धार्मिक स्वरूप प्राप्त होत आहे, असा दावासांगेचे आमदार समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

IIT Goa : सांगे येथील प्रस्तावित आयआयटीची जमीन ही सरकारच्या मालकीची आहे. नऊ लाख मीटर जमिनींपैकी दीड लाख जमिनीवर स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी कब्जा केलेला आहे. तरीही ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमिनी आहेत, त्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल. मात्र, आयआयटीला होणारा विरोध हा केवळ राजकीय असून आता त्याला धार्मिक स्वरूप प्राप्त होत आहे, असा दावासांगेचे आमदार समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या मताप्रमाणे या जमिनी आम्ही पोर्तुगीज काळापासून कसत (पिकवत) आहोत. ‘कसेल त्याची जमीन’ या न्यायाप्रमाणे सरकारने ही जमीन आम्हाला द्यावी. आणि इतर जागेवर आयआयटी प्रकल्प उभा करावा. त्याबाबत बोलताना मंत्री फळदेसाई म्हणाले, की ही जमीन नापीक असून या जमिनीवर कोणत्याच प्रकारची झाडे व शेती नाही. मात्र, काही स्थानिक लोकांनी या जमिनीवर कब्जा केला आहे. काही लोक त्या जमीन पिकवत आहेत.

परंतु ही जमीन सरकारचीच असून शिक्षणासारख्या पवित्र गोष्टीसाठी आम्ही वापरात आणणार आहोत. यापूर्वी सरकारच्या जमिनीवर अतिक्रमण करून काही ठिकाणी जमिनी परस्पर विकल्या होत्या. सरकारने त्यांच्यावर कारवाई करून तेथील अतिक्रमणे ही हटवले आहेत. काही लोकांनी या जमिनीवर काटेरी कुंपण घालून आपला हक्क सांगितला आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे या जमिनीचा खातेउतारा आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना चालू बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळेल. सध्या जो विरोध होतोय तो राजकीय असून आता त्याला धार्मिक स्वरूप प्राप्त होत आहे, असेही फळदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'ती स्वत:ला वाचवण्यासाठी दुसऱ्यांची नावे घेतेय'; पूजा नाईक प्रकरणात मंत्री ढवळीकर यांचं मोठं विधान

Donald Trump: टॅरिफमुळे अमेरिका बनला जगातील 'सर्वात श्रीमंत देश', डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; म्हणाले, 'प्रत्येक नागरिकाला 2000 डॉलर देणार...'

Crime News: क्रूर पती! 'दृश्यम' चित्रपट पाहिला आणि रचला पत्नीच्या खुनाचा कट; गळा दाबून हत्या, पुरावा मिटवण्यासाठी भयानक कृत्य

Terrorist Attack: दहशतवादी कटाचा पर्दाफाश! डॉक्टरच्या घरातून 300 किलो RDX आणि AK-47 जप्त; तपास यंत्रणांची धावपळ

Wasim Akram: "उनको गेंदबाजी करना मतलब एक परीक्षा..." वसीम अक्रमने भारतीय क्रिकेटपटूबाबत केलेलं विधान चर्चेत

SCROLL FOR NEXT