39 A Maha Andolan Dainik Gomantak
गोवा

मंत्र्यांच्‍या दारात आंदोलकांचा ठिय्‍या! भूरूपांतरणावरून पणजीत रणसंग्राम; मुख्‍यमंत्र्यांसोबत चर्चेचा प्रस्‍ताव नाकारला

Maha Andolan: मंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्या बंगल्यासमोरील रस्‍त्‍यावर आंदोलकांनी ठिय्या मांडल्याने गोमेकॉ आणि मणिपालकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सांत-आंद्रे मतदारसंघातील पाळे-शिरदोन येथील भूरूपांतरण रद्द करण्यासह नगरनियोजन कायद्यातील कलम ‘३९-अ’ रद्द करण्‍याची तसेच आमदार वीरेश बोरकर यांना धक्काबुक्की करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करत सुरू असलेल्या आंदोलनाने सोमवारी रात्री नवे वळण घेतले.

आमदार वीरेश बोरकर यांनी येथील बेमुदत उपोषण सुरूच ठेवले आहे. रात्री त्‍यांची प्रकृती खालावली. दुसरीकडे आंदोलनकर्त्यांनी नगरनियोजनंमत्री विश्‍‍वजीत राणे यांच्या दोनापावला येथील खासगी निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन छेडले.

काल रविवारी महाआंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार दुपारनंतर मोठा जमाव जमा झाल्यावर सायंकाळी साडेचारच्या सुमारास मंत्री राणे यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्‍यानंतर डी. बी. मार्गावरून दोनापावलाकडे कूच करताना पोलिसांनी तीन ठिकाणी अडथळे उभे केले. पण काही उपयोग झाला नाही. दरम्‍यान, रात्री मुख्‍यमंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चेची तयारी दर्शविली, परंतु आंदोलकांनी ती फेटाळली.

वाहतुकीची कोंडी

मंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्या बंगल्यासमोरील रस्‍त्‍यावर आंदोलकांनी ठिय्या मांडल्याने गोमेकॉ आणि मणिपालकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होत एक मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात आणि मंत्री राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ठिय्या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

आंदोलनकर्ता जखमी

दोनापावला उतारावर पोलिसांनी रस्ता अडवल्यानंतर काही आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड्स हटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्‍या झटापटीत एक आंदोलनकर्ता बेशुद्ध पडला. त्‍याला तातडीने इस्पितळात हलविण्यात आले. तसेच एका यूट्यूब वाहिनीच्या पत्रकारालाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.

मुख्य मागण्या कोणत्‍या?

१ पाळे-शिरदोन येथील भूरूपांतरण रद्द करणे

२ नगरनियोजन कायद्यातील कलम ‘३९-अ’ रद्द करणे

३ धक्काबुक्की करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करणे

विजय सरदेसाई यांनी घेतली माघार

आमदार विजय सरदेसाई यांनी आझाद मैदानावर उपस्थिती लावली; पण मंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्या खासगी निवासस्‍थानी मोर्चा नेण्याचा निर्णय जाहीर होताच त्यांनी माघार घेतली. ‘‘मी कोणाच्याही खासगी घरी जाणार नाही. आंदोलनाला पाठिंबा आहे; पण ठरावीक ठिकाणीच आंदोलन व्हावे’’ असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार वीरेश बोरकर यांना पोलिसांनी फरफटत नेले, धक्काबुक्की केली. संबंधित पोलिस निरीक्षकाला तत्‍काळ निलंबित करावे. मुख्यमंत्री आम्हाला शिस्त पाळायला सांगतात, पण एका आमदाराला फरफटत नेताना ही शिस्‍त कोठे गेली होती? गेल्‍या तीन-चार दिवसांपासून आझाद मैदानावर शांततेत आंदोलन सुरू असताना सरकारचा एकही प्रतिनिधी भेटायला येत नाही याचा अर्थ काय?
युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते
मुख्यमंत्री आम्‍हाला शिस्‍तीचे धडे शिकवतात. पण नगरनियोजन खात्‍याच्‍या कार्यालयातून आम्हाला उचलून बाहेर टाकताना कोणती शिस्त पाळली गेली? आता पुढे जे काही होईल, ती एक क्रांती असेल.
वीरेश बोरकर, आमदार (आरजी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राहुल गांधींची 'जादूगार' टीपण्णी अन् भाजपचा पलटवार, लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक भिडले; राजनाथ सिंहांची माफीची मागणी

अचानक संकटं येतायेत? राहू-केतूचा अशुभ प्रभाव असू शकतो जबाबदार; वैवाहिक जीवनातील वाद थांबवण्यासाठी शुक्राला करा प्रसन्न

T20 World Cup 2026 Match Fixing: क्रिकेट विश्वात मोठा भूकंप! टी-20 वर्ल्ड कपमध्ये फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटकडून चौकशी सुरु

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

SCROLL FOR NEXT