T20 World Cup 2026 Match Fixing: क्रिकेट विश्वात मोठा भूकंप! टी-20 वर्ल्ड कपमध्ये फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटकडून चौकशी सुरु

T20 World Cup 2026 Match Fixing: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अँटी-करप्शन युनिटने या विश्वचषकातील एका सामन्यात मॅच फिक्सिंग झाल्याच्या संशयावरुन अधिकृत चौकशी सुरु केली.
T20 World Cup 2026 Match Fixing
T20 World Cup 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

T20 World Cup 2026 Match Fixing: भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानाखाली पार पडलेल्या टी-20 विश्वचषक 2026 च्या जेतेपदावर भारताने न्यूझीलंडला पराभूत करुन तिसऱ्यांदा नाव कोरले. भारतीय चाहत्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला असला तरी, आता या स्पर्धेला महिना उलटल्यानंतर एक खळबळजनक माहिती समोर आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अँटी-करप्शन युनिटने या विश्वचषकातील एका सामन्यात मॅच फिक्सिंग झाल्याच्या संशयावरुन अधिकृत चौकशी सुरु केली. या बातमीने संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून खेळाच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

ही चौकशी प्रामुख्याने विश्वचषकातील 31व्या सामन्यावर केंद्रित आहे, जो कॅनडा आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यात कॅनडाचा कर्णधार दिलप्रीत बाजवा याने टाकलेले एक षटक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, न्यूझीलंडच्या डावातील पाचवे षटक अत्यंत संशयास्पद होते. दिलप्रीत बाजवा याने या षटकात नो-बॉल आणि लेग साईडवर वाईड चेंडू टाकले होते, ज्यामध्ये त्याने एकूण 15 धावा दिल्या. कॅनडाच्या (Canada) इतर गोलंदाजांनीही महागडी षटके टाकली असली, तरी बाजवाच्या या विशिष्ट षटकातील चुका फिक्सिंगकडे निर्देश करणाऱ्या असल्याचा संशय आयसीसीला आहे.

T20 World Cup 2026 Match Fixing
T20 World Cup Final 2026: भारत पुन्हा जगज्जेता! फायनलमध्ये किवींची दणादाण उडवत जिंकला टी-20 चा किताब; फलंदाजांबरोबर गोलंदाजही ठरले 'मॅचविनर'

या प्रकरणाला वाचा फुटली ती कॅनडाची सरकारी वाहिनी सीबीसी (CBC) ने प्रसारित केलेल्या एका धक्कादायक डॉक्युमेंट्रीमुळे. ‘द फिफ्थ इस्टेट’ या शोध पत्रकारिता कार्यक्रमांतर्गत 'करप्शन, क्राईम अँड क्रिकेट' नावाची 43 मिनिटांची डॉक्युमेंट्री प्रदर्शित करण्यात आली. या डॉक्युमेंट्रीमध्ये कॅनडा क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले. केवळ आंतरराष्ट्रीय सामनेच नव्हे, तर कॅनडातील स्थानिक क्रिकेटमध्येही आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावा यात करण्यात आला. या डॉक्युमेंट्रीने खळबळ उडवून दिल्यानंतर आयसीसीने तातडीने या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे पाऊल उचलले.

T20 World Cup 2026 Match Fixing
T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

केवळ सामन्यातील फिक्सिंगच नाही, तर कॅनडा क्रिकेट बोर्डातील अंतर्गत कारभाराचीही चौकशी होत आहे. खेळाडूंच्या निवडीसाठी बोर्डाचे सदस्य प्रशिक्षकांवर दबाव टाकत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. एका जुन्या टेलिफोन रेकॉर्डिंगमध्ये तत्कालीन प्रशिक्षक खुर्रम चोहान यांनी बोर्डाच्या सदस्यांकडून विशिष्ट खेळाडूंच्या निवडीसाठी दबाव टाकला जात असल्याचे मान्य केल्याचा दावा केला गेला. आता आयसीसीचे अँटी-करप्शन युनिट या सर्व कागदपत्रांची आणि व्हिडिओची पडताळणी करत आहे. जर या चौकशीत दोषी आढळले, तर कॅनडा क्रिकेटवर मोठी कारवाई होण्याची शक्यता असून विश्वचषकाच्या प्रतिमेलाही यामुळे मोठा तडा गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com