Agriculture minister Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2023 : राज्यात एकूण 2,77,066 रेशनकार्डधारकांची नोंद : रवी नाईक

सरकार पुरवते जीवनावश्यक वस्तू

दैनिक गोमन्तक

गोव्यात विविध प्रवर्गातील एकूण २ लाख ७७ हजार ६६ रेशनकार्डधारक आहेत. राज्यात अंत्योदय अन्न योजनेत ११,२३२, दारिद्र्यरेषेवरील १,४७,६३५ आणि प्राधान्य कुटुंब श्रेणीत १,१८,१९९ रेशनकार्डधारक आहेत, असे नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार मंत्री रवी नाईक यांनी सांगितले.

राज्य सरकार अनेक कुटुंबांना रेशनकार्डद्वारे जीवनावश्यक वस्तू पुरवून आधार प्रदान करते. अंत्योदय अन्न योजना, दारिद्र्यरेषेवरील आणि प्राधान्य कुटुंब रेशनकार्डच्या श्रेणीअंतर्गत लोकांच्या तीन श्रेणी आहेत. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सोमवारी मंत्री रवी नाईक यांना गोव्यातील रेशनकार्डधारकांबाबत अतारांकित प्रश्न विचारला होता.

नागरी पुरवठा विभागाकडे रेशनकार्ड प्रलंबित अर्जांबद्दल टिप्पणी करताना, नाईक यांनी त्यांच्या उत्तरात सांगितले की, २०२३ मध्ये अंत्योदय अन्न योजना श्रेणीतील शून्य प्रलंबित, २ प्राधान्य कुटुंब श्रेणीतील आणि ११६ दारिद्र्यरेषेवरील श्रेणीतील अर्ज आहेत.

अंत्योदय श्रेणीत एकूण १४२ कुटुंबे

२०१९ पासून आजपर्यंत अंत्योदय अन्न योजना श्रेणीत एकूण १४२ रेशनकार्डधारक आहेत. १,५१८ प्राधान्य कुटुंब श्रेणीतील आणि ८,५८५ दारिद्र्यरेषेवरील श्रेणीतील ज्यांनी आपली रेशनकार्ड विभागाकडे सुपुर्द केली आहेत.

त्याचप्रमाणे २०१९ पासून आजपर्यंत अंत्योदय अन्न योजना श्रेणीत एकूण ४१ रेशनकार्डधारक, प्राधान्य कुटुंब श्रेणीतील ४२१ आणि दारिद्र्यरेषेवरील ९३८ रेशनकार्डधारक आहेत ज्यांनी आपली रेशनकार्ड रद्द केली आहेत.

११,२३२ अंत्योदय अन्न योजनेंतर्गत

१,४७,६३५ दारिद्र्यरेषेवरील

१,१८,१९९ प्राधान्य कुटुंब श्रेणीतील

२,७७,०६६ एकूण कार्डधारक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT