IFFI Goa 2024 Dainik Gomantak
गोवा

"IFFI मुळे भारतीय चित्रपटांचे बहुआयामी रूप समोर आले पाहिजे" डॉ. एल. मुरुगन यांच्याकडून तयारीचा आढावा

IFFI Goa 2024: माहिती आणि प्रसारण विभागाचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी इफ्फीच्या तयारीचा आढावा घेतला

Akshata Chhatre

पणजी: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या इफ्फीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. राज्यात यंदा 55 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा केला जाईल. देश विदेशातील चित्रपटप्रेमींसाठी हा सोहळा महत्वाचा असतो आणि दरवर्षी मोठ्या संख्येत लोकं गोव्याला भेट देतात. माहिती आणि प्रसारण विभागाचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी 20 ते 28 नोव्हेंबर या काळात होणाऱ्या इफ्फीच्या तयारीचा आढावा घेतला.

डॉ. एल. मुरुगन यांच्या मते आंतराष्ट्रीय स्थरावर होणाऱ्या या चित्रपट सोहळ्याच्या माध्यमातून गोव्याची सांस्कृतिक विविधता जागतिक पातळीवर प्रदर्शित केली गेली पाहिजे, यासोबतच त्यांनी चित्रपट महोत्सवाच्या कामात सामील असलेल्या सर्वांना मन लावून काम करण्याचे आवाहन केले, कारण यामुळेच इफ्फी आंतराष्ट्रीय स्थरावर यशस्वी उपक्रम म्हणून ओळखला जाईल.

यामधून भारतीय चित्रपटांचे विविध पैलू जागतिक प्रेक्षकांसमोर आले पाहिजेत. प्रादेशिक चित्रपटांपासून ते राष्ट्रीय ब्लॉकबस्टरपर्यंत इफ्फीद्वारे भारतीय चित्रपटांचे बहुआयामी रूप समोर आले पाहिजे असं ते म्हणालेत.

मुरुगन यांनी महोत्सवाच्या प्रचारात जागतिक माध्यमांचे महत्त्व अधोरेखित केले. भारतीय चित्रपटांना आंतराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून द्यायचं असेल आणि जागतिक प्रेक्षकवर्ग जोडायचा असेल तर जगभरातील सर्व माध्यमांशी जोडणं हा एकमेव मार्ग असण्यावर त्यांनी भर दिला.

इफ्फीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या डॉ. एल. मुरुगन यांनी पणजीत विविध स्थळांना भेट देऊन महोत्सवाचं काम निरखून पाहिलं, यामध्ये खास करून शामाप्रसाद मुखर्जी मैदानाचा समावेश होता जिथे चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आणि समारोप होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: कर्नाटकातील कोप्पल येथील स्पर्धेसाठी गोवा संघ रवाना

SCROLL FOR NEXT