Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा

मंत्री मायकल लोबोंचा पत्नीसह काँग्रेसमध्ये प्रवेश

गोव्याला योग्य दिशेने नेण्याची गरज आहे, त्यामुळे मी भाजपचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यातील भाजपचे प्रबळ नेते मायकल लोबो यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मायकल लोबो यांच्यासोबत त्यांची पत्नी डेलिलाह लोबो यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सोमवारी मायकेल लोबो यांच्यासह अन्य आमदार प्रवीण जंते यांनी भाजप (BJP) सोडण्याची घोषणा केली होती. कालपासून मायकल काँग्रेसमध्ये सामील होतील, असे मानले जात होते.

मायकल लोबो हे गोव्यातील कळंगुट मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ते राज्य मंत्रिमंडळात मंत्री होते. मायकल लोबो यांच्या पत्नी भाजपच्या माजी महिला प्रदेश उपाध्यक्षा राहिल्या आहेत. भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मायकल लोबो (Michael Lobo) यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, गोव्याला (goa) योग्य दिशेने नेण्याची गरज आहे, त्यामुळे मी भाजपचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये (Congress) जाण्याचा निर्णय घेतला आहे.

तत्पूर्वी, सोमवारी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर मायकल लोबो यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे सांगितले. विशेषत: तळागाळातील कार्यकर्त्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली जात होती, ते त्रासदायक होते, त्यामुळे मी भाजपचा राजीनामा दिला आहे. मायकल लोबो हे प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात बोलके मंत्री मानले जात होते. मंत्रिमंडळातील ते तिसरे ख्रिस्ती मंत्री होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

Goa Politics: 2 ऑक्टोबरला वीरेश बोरकरांची मोठी घोषणा; मनोज परबांच्या 'आरजी' प्रवेशाच्या चर्चांदरम्यान विशेष मुलाखतीत भूमिका स्पष्ट

Porsche Cayenne Electric भारतात लॉन्च! 2.5 सेकंदात 100 kmph, 642 किमी रेंज; जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होईल, रमेश तवडकरांचा विश्वास

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT