'काँग्रेसची टीएमसी सोबत युती नाही, 'या' चर्चा पूर्णपणे निराधार आणि असत्य'

लवकरच गोव्याला पुन्हा प्रगतीच्या मार्गावर आणू असा पक्षाला विश्वास आहे
Goa Trinamool congress
Goa Trinamool congress Dainik Gomantak

गोवा विधानसभा निवडणूक 2022 मध्ये काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवू शकतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी असे काहीही होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांच्या भेटीत तृणमूल काँग्रेससोबत युती करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे काँग्रेस ((Congress)) नेते केसी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. केसी वेणुगोपाल यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, बैठकीत राहुल गांधी यांनी टीएमसीसोबत संभाव्य युतीबाबत चर्चा केल्याची अफवा “पूर्णपणे निराधार आणि असत्य” आहे.

Goa Trinamool congress
गोवा सरकारने आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटीजन चाचणीचे दर केले निश्चित

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल म्हणाले, "राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारच्या बैठकीत टीएमसीसोबत संभाव्य युतीबाबत चर्चा केलेली अफवा पूर्णपणे निराधार आणि असत्य आहे. आम्ही लवकरच गोव्याला पुन्हा प्रगतीच्या मार्गावर आणू असा विश्वास काँग्रेस पक्षाला आहे.

राहुल गांधी यांनी सोमवारी संध्याकाळी महासचिव केसी वेणुगोपाल आणि गोव्याचे (goa) AICC वरिष्ठ निरीक्षक पी चिदंबरम यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत राहुल गांधी यांनी राज्यातील निवडणुकीची (election) तयारी आणि काँग्रेसच्या प्रचाराच्या रणनीतीचा आढावा घेतला. गोवा विधानसभेची निवडणूक (Assembly elections) फेब्रुवारीत होणार आहे. गोव्यात 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. याआधी, आम आदमी पार्टी (आप) ने देखील 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेससोबत युती करणार नसल्याचे सांगितले होते.

Goa Trinamool congress
'युती झाल्यास 'या' पक्षाला मिळणार चार जागा'

दरम्यान, तृणमूल (Trinamool) काँग्रेसने मंगळवारी गोव्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी आवास अधिकार योजना जाहीर केली. टीएमसीच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, "ही गोवावासीयांचे गृहनिर्माण हक्क सुरक्षित करण्याच्या उद्देशाने एक ऐतिहासिक योजना आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com