वास्को: गोवा माईल्स सेवा दाबोळी विमानतळाबरोबर मोपा येथील आगामी विमानतळावर देखील उपलब्ध असेल. तसेच डिसेंबरपर्यंत मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट एग्रीकेटर सिस्टम सुरु करु जेणेकरुन प्रवासी कॅब, इलेक्ट्रिक बस, ऑटो रिक्षा किंवा मोटरसायकल बुक करू शकतील असे वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी सांगितले.
(Mauvin Godinho today reopened GoaMiles a government-based taxi service counter)
गोवा माईल्स या सरकार आधारित टॅक्सी सेवा काउंटरचा शुभारंभ आज पुन्हा एकदा दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते. दरम्यान गोवा माईल्स काऊंटरच्या उद्घाटनापूर्वी एकाने या काऊंटरला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला अटक करत 151 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
पुढे बोलताना मंत्री गुदिन्हो म्हणाले की गोवा पर्यटन विकास मंडळाअंतर्गत 2018 मध्ये राज्यात टॅक्सीसाठी परवडणारा पर्याय म्हणून गोवा 'माईल्स ॲप' (GoaMiles) लॉन्च करण्यात आले. तथापि सेवेला टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर्सच्या विरोधाचा आणि निषेधाचा सामना करावा लागला. त्यामुळे सरकारला दाबोळी विमानतळावरील काउंटर गेल्यावर्षी 10 ऑक्टोबर रोजी बंद करणे भाग पडले.
तसेच आणखी एक काउंटर हाती घेण्यात आला आहे जो कदंबासाठी असेल. ज्यामध्ये विभागाकडून इलेक्ट्रिकल बसेस घेतल्या जातील आणि आणीबाणीच्या परिस्थितीत उत्तर आणि दक्षिण गोवा किमान पॉईंट टू पॉईंट सेवा दिली जाईल असे ते म्हणाले.
ॲपवर आधारित टॅक्सी सेवा ही आज काळाची गरज आहे. अर्थातच गोव्यातील टॅक्सीवाल्यांनी नेहमीप्रमाणे त्याला विरोध केला आहे. कारण या टॅक्सी सेवेमुळे गोव्यातील मूळ टॅक्सी वाल्यांचे नुकसान होईल असे टॅक्सीवाल्यांचे म्हणणे आहे. मात्र तसे होणार नाही.त्यामुळे राज्यातील टॅक्सी चालक आणि गोवा माईल्सशी जोडणी करावी अशी ही त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.
कडक नजर ठेवून कारवाई करावी
दरम्यान हायजेकर्स जे चोरट्या मार्गाने दाबोळी विमानतळावरून भाडे नेतात, त्यांना कोणत्याही प्रकारे विमानतळ परिसरात थारा देऊ नये अशी सूचना मंत्री मावीन गुदिनो यांनी वाहतूक पोलीस दाबोळी पोलिसांना यावेळी दिली. हे हायजेकर्स पर्यटकांकडून बळजबरीने त्यांचे (लगेज) सामान ओढून नेतात व त्यांच्याकडून मग तोंडाला येईल ते भाडे वसूल करून घेतात. अशांवर आता कडक नजर ठेवून कारवाई करावी असा आदेश मंत्री गुदिन्हो यांनी पोलिसांना दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.