गोवेकरांना मोपाचे वेध लागले आणि दाबोळी विमानतळाचं भवितव्य काय ? यावरुन चर्चांना गोव्यात उधाण आले. दाबोळी विमानतळ आता बंद होणार? गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांचा ओघ मोपाकडे वळणार? अशा चर्चा सुरु झाल्या. याला आता पुर्णविराम मिळणार आहे. कारण वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी दाबोळी विमानतळ कधीच बंद होणार नाही अशी माहिती दिली आहे.
(minister mauvin godinho said I ensure the people that Dabolim airport will never close)
मिळालेल्या माहितीनुसार आज एका कार्यक्रमात वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी दाबोळी विमानतळ कधी ही बंद होणार नाही अशी माहिती दिली आहे. गोव्यात यापुढे वाटत जाणाऱ्या पर्यटकांचा ओघ लक्षात घेता राज्यातील दोन्ही विमानतळे पुर्णक्षमेतेने कार्यक्षम असतील ज्याच्यामुळे सर्व पर्यटकांना अनेक सुलभ सेवा मिळू शकणार आहेत असे ही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना मंत्री गुदिन्हो म्हणाले दोन्ही विमानतळे कार्यक्षम राहणार आहेत. तरीही त्यांना पिवळ्या टॅक्सी, ओला, उबेर किंवा इतर प्रवासाच्या सोयी - सुविधांचा फायदा घेण्यासाठी पुर्ण स्वातंत्र्य असणार आहे. पर्यटकांवर कोणत्याही प्रकारची बंधने लादता येणार नाहीत. असे ही त्यांनी म्हटले आहे. गेल्या चार दिवसांत अमेरिकन पर्यटकांची झालेली गैरसोय यावरुन त्यांनी टॅक्सी चालकांना हा टोला लगावला आहे.
टॅक्सी चालकांची गैरवर्तन खपवून घेतली जाणार नाही - मुख्यमंत्री
आज गोवामुक्ती दिन कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्र्यांनी गोमंतकीयांना संबोधित केले यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केले. यापैकी काही महत्त्वाचे मुद्दे
दरडोई उत्पन्नात गोवा देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
राज्यात येणाऱ्या पर्यटकांना त्रास देणाऱ्या त्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात राज्य सरकार कठोर कारवाई करणार.
टॅक्सी चालकांची दादागिरी आणि गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. टॅक्सी व्यवसायिकांनी पर्यटनाचा भाग व्हावे आणि त्यासाठी सहकार्य करावे.
राज्यातील बेरोजगारीचा दर कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या वर्षांत राज्यात रोजगार निर्माण करण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत करतोय. तसेच, महिला सशक्तीकरण या मुद्यावर देखील आम्ही प्रामुख्याने काम करत आहोत.
राज्याच्या प्रगतीचा साक्षिदार होणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण गोल्डन गोवा या स्वप्नाच्या जवळ जात आहोत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.