Industrial Workers|Mauvin Godinho Dainik Gomantak, Canva
गोवा

Goa Industrial Policy: नव्या औद्योगिक धोरणाने होणार 'मजुरांचे कल्याण'! मंत्री गुदिन्होंनी केले सूतोवाच

Mauvin Godinho: वातावरणामुळे राज्यात व्यवसाय येण्याचे प्रमाण वाढले आहे; गोव्याचे अनोखे आकर्षण अनुभवत उद्योगांनी भरभराटीसाठी गोव्यात यावे असे गुदिन्हो म्हणाले

गोमन्तक डिजिटल टीम

New Industrial Policy For Goa

पणजी: औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्य सरकार नवीन धोरण राबवणार असल्याचे उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी आज येथे नमूद केले. लॉजिस्टीक विषयावर भारतीय उद्योग महासंघाच्या गोवा शाखेने आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते. यावेळी पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा उपस्थित होते.

गुदिन्हो म्हणाले की, औद्योगिक वसाहतीत सध्या कामगार अनधिकृतपणे राहतात. त्यांची निवास व्यवस्था कशी असावी यावर कोणाचेही सध्या नियंत्रण नाही. मात्र कामगारांना सुरक्षित आणि स्वच्छ राहण्याच्या जागेत राहता यावे यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. अशी निवास व्यवस्था तयार करण्यावर धोरण लक्ष केंद्रित करेल. हे पाऊल मजुरांचे कल्याण आणि औद्योगिक वातावरण सुधारण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे.

राज्यात दोन विमानतळ आहेत. मोठे बंदर आहे तसेच लोहमार्गाने तिन्ही बाजूने राज्य जोडलेले आहे. त्यामुळे येथे औद्योगिकीकरणासाठी बराच वाव आहे. सरकारचे व्यवसाय सुलभता धोरणही साह्यकारी ठरत आहे. सरकार नेहमीच राज्यात उद्योगांसाठी स्वागतार्ह वातावरणावर भर देत आहे. गोव्यात केवळ व्यवसायासाठी अनुकूल वातावरण नाही तर कामगार आणि अभ्यागतांसाठी अनेक आनंददायक वातावरण आहे. गोव्यातील लोक त्यांच्या मित्रत्वासाठी ओळखले जातात. येथील या वातावरणामुळे राज्यात व्यवसाय येण्याचे प्रमाण वाढले आहे. लोकांमध्ये चांगुलपणा वाढवूया. गोव्याचे अनोखे आकर्षण अनुभवत उद्योगांनी भरभराटीसाठी गोव्यात यावे, असे गुदिन्हो म्हणाले.

मुरगाव तालुका कोळसामुक्त करण्‍याचा प्रयत्‍न

मुरगाव (Mormugao) बंदर प्रशासनाचे अध्यक्ष के. विनोदकुमार यांनी बंदरात घुमट उभारण्यात येत असल्याची माहिती दिली होती. त्याचा संदर्भ घेत गुदिन्हो म्हणाले, वास्को शहरासह मुरगाव तालुका कोळसा प्रदूषणमुक्त करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे. बंदरात घुमटाखाली कोळसा हाताळणी झाली की प्रदूषणाचा प्रश्नच राहणार नाही. सिक्वेरा म्हणाले, पर्यावरणपूरक असे हे पाऊल आहे. याचे अनुकरण इतर ठिकाणीही केले जावे. बंदरातील बांधकामाधीन घुमट ही समस्या प्रभावीपणे सोडवेल, ज्यामुळे व्यवसाय आणि स्थानिक रहिवाशांना फायदा होईल. "ही सर्वांसाठी विजयाची परिस्थिती आहे," या प्रकल्पामुळे प्रदेशातील कोळशाच्या धुळीशी संबंधित चिंता दूर होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT