प्रखर संघर्षातूनच आपल्‍याला मिळते यश Dainik Gomantak
गोवा

प्रखर संघर्षातूनच आपल्‍याला मिळते यश

मंत्री गोविंद गावडे : खांडोळा सरकारी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन

दैनिक गोमन्तक

पणजी: वेडी माणसं इतिहास घडवतात आणि शहाणी माणसे तो वाचतात. दिवसा पडणाऱ्या स्वप्नांना आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्या स्वप्नपूर्तीसाठी प्रखर संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. कारण प्रखर संघर्षातूनच यश मिळते, असे प्रतिपादन कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी केले. ते कला, विज्ञान आणि वाणिज्य शासकीय महाविद्यालय खांडोळा व उच्च शिक्षण संचालनालयाने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा व करियर मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.

यावेळी उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर, महाविद्यालयाच्या प्राचार्य पूर्णकला सामंत, आयएमएस लर्निंग रिसोर्सचे कमलेश सजनानी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयएमएसचे विनय कुडवा यांनी सादरीकरणातून स्पर्धा परीक्षा व करियर मार्गदर्शन या विषयी माहिती दिली. प्राचार्य पूर्णकला सामंत यांनी स्वागत केले. दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी उद्घाटन केले. आभार उपप्राचार्य आशा गेहलोत यांनी मांडले.

येथे मिळणार प्रशिक्षण

सरकारी महाविद्यालय साखळी, महाविद्यालय खांडोळा, शासकीय महाविद्यालय केपे, वाणिज्य आणि अर्थशास्त्र शासकीय महाविद्यालय बोर्डा, संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालय पेडणे, गोवा कॉलेज ऑफ होम सायन्स पणजी.

परीक्षा केंद्रांचा असा आहे हेतू

सध्याचे युग हे स्पर्धात्मक युग आहे. या युगात मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी चढाओढ असते. अशा चढाओढीत गोव्यातील विद्यार्थी मागे राहू नये म्हणून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्पर्धा परीक्षा व करियर मार्गदर्शन या उपक्रमाची उच्च शिक्षण संचालनालयामार्फत आखणी करण्यात आलेली आहे.

जीपीएससी, बँकिंग, युपीएसी, रेल्वे एलआयसी आदींसाठी लागणाऱ्या परीक्षांची तयारी करुन घेणे व एमबीए पूर्व परीक्षा, सीएटी, एमएटी, एसएनएपी, सीएमएटी, एक्सएटी, जीआरई, आणि जीएमएटी आदींबाबत मार्गदर्शन करणे. राष्ट्रीय पातळीवरील नावाजलेल्या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन गोव्यातील विद्यार्थ्यांना राज्यातील तसेच राष्ट्रीय पातळीवरील आघाडीच्या महाविद्यालयांमध्ये तसेच व्यावसायिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देणे व स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करणे. पदव्युत्तर स्तरावरती जगभरातल्या नावाजलेल्या संस्थांमध्ये गोव्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायला हवा. गोव्यातील विद्यार्थ्यांना केवळ देशातच नव्हे तर परदेशातील विद्यापीठांमध्ये संधी मिळावी यासाठी आयएमएस कार्यरत राहणार आहे.

- कमलेश सजनानी, संचालक, आयएमएस लर्निंग रिसोर्स

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT