Govind Gaude 

 

Dainik Gomantak 

गोवा

गोविंद गावडेंच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंकडून उमेदवारीची ऑफर

दैनिक गोमन्तक

पणजी : अपक्ष आमदार गोविंद गावडे (Govind Gaude) भाजपत येत असल्यास त्यांचं स्वागतच असेल. त्यांनी भाजपात प्रवेश केल्यास प्रियोळमधून त्यांनाच उमेदवारी द्यावी लागेल. तो पक्षाचा निर्णय असेल, अशी घोषणा गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केली आहे.

गोविंद गावडेंना उमेदवारी दिल्याच्या परिस्थितीत कोणी पक्षविरोधी बंड केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. प्रियोळ भाजप (BJP) मंडळ पक्षाच्या निर्णयाविरोधात जाणार नाही, असंही भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी स्पष्ट केलं आहे. गोव्यात सध्या फोडाफोडीचं राजकारण शिगेला पोहोचलं आहे. त्यातच ज्या नेत्यांचं त्यांच्या मतदारसंघात प्राबल्य आहे, अशांना आपल्या पक्षात घेण्यासाठी रस्सीखेचही सुरु आहे.

गोविंद गावडे सध्या सध्याच्या भाजप सरकारमध्ये कला आणि सांस्कृतिक तसेच आदिवासी विकास मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे. तसेच प्रियोळ मतदारसंघात गोंविंद गावडे यांची लोकप्रियताही चांगली आहे. त्यामुळे भाजपला आगामी निवडणुकीत (Goa Election) त्याचा फायदाच होणार आहे. गोव्यात (Goa) सध्या भाजपसमोर अनेक आव्हानं उभी ठाकलेली आहेत. यात पक्षांतर्गत कलहाचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गोविंद गावडेंना भाजपने उमेदवारी दिल्यास त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT