Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Panaji: स्मार्ट पणजीसाठी थोडा त्रास सहन करावाच लागेल; मंत्री बाबूश मोन्सेरात

देशातील स्मार्ट शहरांच्या यादीत गोव्याची राजधानी पणजीचा देखील समावेश आहे.

Pramod Yadav

Smart City Panaji: मागील अनेक दिवसांपासून पणजीत विविध कामे सुरू आहेत, विशेषत: सुरू असलेली रस्त्याची कामं यामुळे वाहतूकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पणजीतील प्रमुख रस्ते खोदल्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. देशातील स्मार्ट शहरांच्या यादीत गोव्याची राजधानी पणजीचा देखील समावेश आहे. पण, सहा महिन्यांपेक्षा अधिककाळ सुरू असलेल्या कामांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

पणजीचे आमदार व गोवा सरकारमधील मंत्री बाबूश मोन्सेरात ( Babush Monserratte) यांनी पणजीमधील सुरू असलेल्या कामांबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. "पणजीत सुरू असलेली कामे विकासासाठीच. अशा कामांना जनतेकडून सहकार्य अपेक्षित आहे. तसेच, स्मार्ट पणजीसाठी थोडा त्रास सहन कारावाच लागेल." असे बाबूश मोन्सेरात म्हणाले.

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून पणजीत विविध ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. तसेच, रस्त्याचे खोदकाम केल्याने विजेची लाईन, पाण्याची लाईन तुटत आहेत. यामुळे वीजपुरवठा खंडीत होणे, पाणीपुरवठा विस्कळीत होणे यासारख्या समस्यांचा सामना नागरिकांना कारावा लागत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT