Aleixo Sequeira X
गोवा

Goa Land Scams: 'जमीन घोटाळ्या'वरुन कारवाई का नाही? सिक्‍वेरांच्या वादग्रस्त विधानावरुन वकील संघटना नाराज

Aleixo Sequeira: गोव्‍यातील जमीन घोटाळ्याशी आणि रजिस्‍ट्रार कार्यालयामध्‍ये होणाऱ्या भ्रष्‍टाचारामध्‍ये गोव्‍याच्‍या वकिलांचाही हात आहे, असे कायदा मंत्री आलेक्‍स सिक्‍वेरा यांनी हल्‍लीच विधान केले होते. त्‍या विधानाचा सांगे-केपे वकील संघटनेने निषेध केला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Aleixo Sequeiras Controversial Statement About Lawyers Notaries Involving Goa Land Scam

सासष्टी: गोव्‍यात झालेल्‍या भूबळकाव प्रकरणात काही नोटरी आणि वकिलांचा सहभाग होता, अशा आयशाचे कायदामंत्री आलेक्‍स सिक्‍वेरा यांनी केलेले विधान वादाच्‍या भोवऱ्यात सापडले आहे. चौकशी समितीने अहवाल देऊन वर्ष उलटल्‍यावर सरकारला नोटरी आठवू लागले आहेत. सरकार अहवालात खुलासा का करत नाही, असा सवाल उपस्‍थित केला जात आहे.

गोव्यातील जमीन बळकावण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने न्यायमूर्ती जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीच्या अहवालाचा हवाला देत कायदामंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी वरील विधान केले होते.

त्‍यानंतर वर्ष उलटले, तरीही दोषींवर कारवाई का केली नाही, असा प्रश्‍‍न उपस्‍थित करण्‍यात येत आहे. त्‍यासंदर्भात सिक्‍वेरा यांना प्रश्‍‍न केला असता ‘संबंधितांची चौकशी करून त्‍यांना निलंबित केले जाईल. त्‍या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे’, असे ते म्‍हणाले. दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयात लोकांची गाऱ्हाणी ऐकल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.

कायदा मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध

गोव्‍यातील जमीन घोटाळ्याशी आणि रजिस्‍ट्रार कार्यालयामध्‍ये होणाऱ्या भ्रष्‍टाचारामध्‍ये गोव्‍याच्‍या वकिलांचाही हात आहे, असे कायदा मंत्री आलेक्‍स सिक्‍वेरा यांनी हल्‍लीच विधान केले होते. त्‍या विधानाचा सांगे-केपे वकील संघटनेने निषेध केला आहे. यासंदर्भात मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून सिक्‍वेरा यांच्‍यावर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT