Mining trucks Dainik Gomantak
गोवा

'रस्ता व्यवस्थित होईपर्यंत मयेत खनिज वाहतूक नको'

मये-वायंगिणी पंचायतीच्या सरपंचाकडून मागणी, खनिज वाहतूक खोळंबणार

दैनिक गोमन्तक

डिचोली : खोदकामामुळे मये गावातील अंतर्गत रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. हा रस्ता सुस्थितीत येईपर्यंत खनिज वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी मये-वायंगणी पंचायत सरपंच सीमा आरोंदेकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी उपसरपंच संतोष गडेकरही उपस्थित होते. (Goa Mining News Updates)

बेदरकार वाहतूक (Traffic) आणि धूळ प्रदूषण यामुळे त्रस्त बनलेल्या मयेतील जनतेने मंगळवारी सुमारे तासभर खनिज वाहतूक रोखली होती. आता सरपंचांनी सध्या खनिज वाहतुकीस विरोध केला आहे. त्यामुळे आधीच वादातीत बनलेल्या खनिज वाहतुकीसमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. डिचोली (Bicholim) तालुक्यातील मये येथे रस्त्याच्या बाजूने नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यातच जिओ या दूरसंचार कंपनीतर्फे केबल टाकण्याचेही काम सुरु आहे. सध्या या रस्त्यावरुन खनिज वाहतुकीचा ताण वाढला आहे.

आधीच खोदकामामुळे या रस्त्याची दशा झाली आहे. त्यात खनिज (Mining) वाहतूक यामुळे या रस्त्यावर मोठी समस्या निर्माण होत आहे. केळबायवाडा येथे तर जलवाहिनीचे जुनाट पाईप फुटून पाण्याचीही समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत, असे सरपंच सीमा आरोंदेकर यांनी स्पष्ट केले आहे. जलवाहिनी आणि केबल टाकून रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत खनिज वाहतूक चालूच राहिल्यास समस्येत भर पडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT