Pilgao mining issue Dainik Gomantak
गोवा

Pilgao: खाणविरोधी आंदोलनकर्त्यांना नोटीस! पिळगावात खळबळ; संतप्त जमावाची पोलिस स्थानकावर धडक

Pilgao Mining Transport Dipsute: खाण विरोधी आंदोलनकर्त्यांची ही सतावणूक असल्याचे कामगारांचे कायदा सल्लागार ॲड. अजय प्रभूगावकर यांनी म्हटले आहे.

Sameer Panditrao

Pilgao mining issue

डिचोली: खनिज वाहतूक आंदोलनप्रश्नी पोलिसांनी नोंद केलेल्या गुन्ह्यावरून उपजिल्हाधिकाऱ्यांनी सेसा कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कपात केलेल्या कामगारांना नोटीस बजावली आहे. यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये खळबळ माजली आहे.

दरम्यान, नेमक्या कोणत्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे, त्याची खातरजमा करून घेण्यासाठी पिळगावातील आंदोलनकर्त्यांनी डिचोली पोलिस स्थानकावर धडक दिली , अशी माहिती मिळाली आहे.

त्यामुळे पिळगावातील आंदोलनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकप्रकारे खाण विरोधी आंदोलनकर्त्यांची ही सतावणूक असल्याचे कामगारांचे कायदा सल्लागार ॲड. अजय प्रभूगावकर यांनी म्हटले आहे.

१९ रोजी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी

खनिज वाहतूकप्रश्नी गेल्या १ जानेवारी रोजी केलेल्या आंदोलनावेळी अशोभनीय भाषा वापरल्यासंदर्भात डिचोली पोलिसांनी बीएनएनएसच्या १२६ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्याला अनुसरून सेसा कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलेश कारबोटकर, बाबुसो कारबोटकर आणि अनिल सालेलकर या कपात केलेल्या कामगारांना उपजिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. १९ रोजी सकाळी १०.३० वा. उपजिल्हाधिकारी न्यायालयात हजर राहावे, असे नोटिशीत नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: हातात बेड्या, शेजारी पोलिस तरीही बेभान होऊन नाचला; मित्राच्या लग्नासाठी जेलमधून आला सरदार भावड्या

Cash For Job: ‘कॅश फॉर जॉब’मध्ये शोषितांचे काय चुकले?

Child Abuse Awareness: गोव्यात एका वर्षात 202 बालकांवर अत्याचार; दुष्कृत्यांविरुद्ध लढण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याची गरज

Konkani Drama Competition 2025: कोकणी नाट्यस्पर्धेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ‘भोगपर्व’ प्रथम, जाणून घ्या संपूर्ण निकाल..

अग्रलेख: ‘कॅश फॉर जॉब’मध्ये 'पूजा' कलंकित ठरली, परंतु तिचा ‘गॉडफादर’ कोण हे कळायलाच हवे..

SCROLL FOR NEXT