Vedanta mining Company In Goa Dainik Gomantak
गोवा

Vedanta: वेदांता गोव्‍यातील खाणी कर्जफेडीसाठी विकणार?

6 कंपन्‍यांत विभाजन : समभागधारक गोंधळले

दैनिक गोमन्तक

Mining Giant Vedanta: खाण उद्योगातील अग्रगण्‍य ‘वेदांता’चे सहा कंपन्‍यांत विभाजन होईल, असे स्‍पष्‍ट संकेत मिळाले आहेत. काही वर्षांपासून कंपनीवरील कर्जात प्रचंड वाढ झाली असून, त्‍यावर मार्ग काढण्‍यासाठी अनेक क्लृप्त्या वापरल्‍या जात आहेत.

गोव्‍यात २००७ मध्‍ये ५१ टक्‍के समभाग खरेदी करून ताब्‍यात घेतलेल्‍या ‘सेसा’च्‍या खाणींची ‘वेदांता’कडून विक्री होऊ शकते, अशीही चर्चा उद्योग वर्तुळात सुरू आहे. मात्र, ‘वेदांता’ने त्‍यावर कोणताही खुलासा केलेला नाही.

कंपनीची काही धोरणे चुकल्‍यामुळे कर्जाचा डोंगर वाढला आहे, असे तज्‍ज्ञांचे मत आहे. सध्‍या व्‍याजापोटी भरमसाट रक्‍कम मोजावी लागतेय. त्‍याचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला. काही महिन्‍यांत प्रति समभाग भाव ४२५ रुपयांवरून २१० पर्यंत घसरला.

मध्‍यंतरी कंपनीच्‍या वरिष्‍ठ पातळीवर बैठका झाल्‍या; परंतु त्‍यातून फारसे काही हशील झाले नव्‍हते. प्रवर्तकांनी कर्ज तारण म्हणून गहाण ठेवलेल्या शेअर्सचे मूल्य अधिक घटले होते. अखेर स्‍थितीवर तोडगा काढण्‍यासाठी कंपनीने सहा कंपन्‍यांत विभाजन करण्‍याचे निश्चित केले आहे. या वरून पार्श्वभूमीवर गोव्‍यातील खाणींचा विक्री व्‍यवहार केला जाईल का, अशी शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे.

या संदर्भात ‘गोमन्‍तक’ने ‘सेसा-वेदांता’च्‍या अधिकारीणीशी संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. ‘जेएसडब्‍ल्‍यू’ ग्रुप आपला विस्‍तार करत असून, उपरोक्‍त घडामोडीशीही त्‍यांचाही संबंध जोडला जात आहे.

अंदाज व वास्‍तव

  1. ‘वेदांता’ला २०२४मध्‍ये 2 दशलक्ष डॉलर कर्जाची परतफेड करायची आहे. त्‍यासाठी कंपनी व्‍यवसायाचा काही भाग विकू शकते.

  2. कंपनीने शुक्रवारी २५०० कोटींचे नवीन कर्ज उभारण्याची घोषणा केली. त्‍यामुळे शेअर्सनी ३ टक्‍क्‍यांनी उसळी घेतली, हा आशेचा किरण.

वेदांताची योजना अशी...

  • उद्योगाची ॲल्‍युमिनियम, गॅस, पॉवर, स्‍टील, बेस मटेरिअर व वेदांता लिमिटेड अशा ६ कंपन्‍यांत विभागणी करणे.

  • त्‍यामुळे समभागधारकांना एका शेअरसोबत नवे ५ शेअर्स मिळू शकतील. कंपनीलाही गुंतवणूक वाढवता येईल.

"तांबे-ॲल्‍युमिनियम हे वेदांताचे जुने उद्योग आहेत. त्‍यामुळे ते विकले जाण्‍याची शक्‍यता कमी आहे. लोहखनिज व तेल हे त्यांचे नवे उद्योग. त्यापैकी तेलाचे भाव वाढत असल्‍याने हा उद्योग विकणे शहाणपणाचे ठरणार नाही. डळमळीत असलेल्या लोहखनिजावर ‘हातोडा’ पडेल, असेच दिसते."

- राजेंद्र काकोडकर, अर्थतज्‍ज्ञ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'ये अज्ञानी', गोव्याला 'कायदाहीन' म्हणणाऱ्या केजरीवालांना भाजपने दिला दम; Post Viral

Goa Liquor Seized: 2 महिने गायब ट्रक सापडला कुंकळ्ळीत, तपासणीत मिळाली लाखोंची दारू; मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

ED Raid: दुबईत हवालामार्गे गुंतवणूक! संशयावरून ‘ईडी’ची गोवा, दिल्लीत छापेमारी; अनेकजण ताब्यात

Goa Live News: डिचोलीच्या बगलमार्गावर गुराचा बळी

Goa Crime: बंगळूरमधून आले गोवा फिरायला, जंगलात केली प्रेयसीची हत्या; संशयिताविरुद्ध आरोप निश्चित

SCROLL FOR NEXT