Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: वालंकिणीहून परतणाऱ्या मिनी बसला रामनगर येथे अपघात

म्हापशातील सात जखमी : एक जण गंभीर

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Accident News: तामिळनाडू वालंकिणी येथील सायबिणीचे दर्शन घेऊन गोव्यात येताना धारवाड-गोवा मार्गावरील रामनगरनजीक असलेल्या कुंभार्डा कोडगाई क्रॉस येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला मिनी बसने धडक दिल्याने म्हापशातील सात भाविक जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका भाविकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

जीए-03-व्ही-0289 क्रमांकाच्या विंगर बसमधूून 10 जण तामिळनाडू येथील वालंकिणी येथे सायबिणीच्या दर्शनाला गेले होते. तेथून गोव्याच्या दिशेने येताना गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कुंभार्डा येथे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ते रस्त्यालगतच्या झाडाला धडकले.

जखमींची नावे

  • जॉन फर्नांडिस (वय 38)

  • तोजेंता परेरा (वय 15),

  • इसाबेल फर्नांडिस (वय 40),

  • जीन परेरा (वय 45),

  • मालिन जॉन फर्नांडिस (वय 8),

  • जॉन्सन फर्नांडिस (वय 3),

  • जेनुस्ता परेरा (वय 17)

चालकावर गुन्हा

बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी चालकावर गुन्हा नोंदवला आहे, अशी माहिती लोंढा पोलिस स्थानकाचे एएसआय एम. एस. कामत यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, या अपघातात दोन मुलांसह सहा भाविक किरकोळ जखमी असून एकजण गंभीर जखमी आहे. गंभीर जखमी भाविकाचे नाव जॉन फर्नांडिस असे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

Sanquelim Road Issue: देसाईनगर साखळीतील रस्ता बनला धोकादायक; तातडीने डागडुजीची करण्याची रहिवाशांची मागणी

Panjim: मांडवी किनाऱ्यावरील अष्टमीच्या फेरीला जत्रेचे स्वरूप, सुटीमुळे खरेदीसाठी उडाली झुंबड

World Cup 2025: वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर, 'या' युवा खेळाडूकडे संघाची कमान, संघात कोण-कोण?

Goa Beef Shortage: तेलंगणामधून 'गोमांस' आले, तरी भूक भागत नाही! गोव्यात पुरवठा मर्यादित; ग्राहक हवालदिल

SCROLL FOR NEXT