Mine processing has been started 
गोवा

कोळसा खाणींसाठी प्रक्रिया सुरू

गोमंतक वृत्तसंस्था

पणजी : मध्यप्रदेशातील डोंगरी सिंग्रावली येथील खाणीतून कोळसा काढण्यासाठी येत्या १० नोव्हेंबरपर्यंत कंत्राटदार कंपनी निश्चित केली जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारला हा कोळसा खाणपट्टा केंद्र सरकारने दिला आहे.

कंत्राटदार निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास आज सार्वजनिक खासगी भागीदारी विभागाच्या सुकाणू समितीच्या बैठकीत ठरवण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्याला राज्याचे मुख्य सचिव परीमल राय, विभागाचे संचालक सुरेश शानभोग आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, खाणीतील कोळसा बाहेर काढला की राज्य सरकार त्याचा ई-लिलाव पुकारणार आहे. हा व्यवसाय आहे. कोळशाच्या बदल्यात वीज मिळत असेल, तर त्यविषयी निर्णय घेतला जाणार आहे. तूर्त आजच्या बैठकीत या सर्व प्रक्रियेसाठी एक्सपेनो कॅपिटल सर्विसेस प्रा. लि. ही कंपनी सल्लागार म्हणून नियुक्त करण्याचे ठरले आहे. त्याला नंतर मंत्रिमंडळात कार्योत्तर मंजुरी दिली जाईल. खाणीतून कोळसा काढण्यासाठी तीन कंपन्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. सल्‍लागार कंपनी याबाबत सरकारला अहवाल सादर करून कोणत्या कंपनीकडे काम सोपवल्यास ते राज्याच्या हिताचे ठरू शकते याविषयी मार्गदर्शन करणार आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: झटपट श्रीमंत होण्याची संधी! 'या' राशींसाठी मंगळाचे गोचर ठरणार 'वरदान'; मात्र काही लोकांनी राहावे सावधान

Khandola: कातळावर फुलवले नंदनवन! गोव्यातील ज्येष्ठ शेतकऱ्याने घडवला चमत्कार

Drum Circle Goa: गोव्याचा निळाशार समुद्र, लाटांची गाज; किनाऱ्यावर रंगणारी तालवाद्यांची मैफिल ‘ड्रम सर्कल’

ICU मध्ये असलेल्या मोरोक्कोच्या महिलेवर गोव्यात बलात्कार, सोलापूरच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला अटक

Goa Pollution Control: नियंत्रण मंडळाचे मोठे पाऊल! किनारी, औद्योगिक भागातील प्रदूषण रोखण्यासाठी होणार तपासणी मोहीम

SCROLL FOR NEXT