Finger millet Awareness in Farmer Dainik Gomantak
गोवा

Millet Farming Awareness: नाचणी लागवडीसाठी १५ एप्रिलपासून जागृती

बियाणे मोफत : शेतकऱ्यांना नांगरणी, कुंपणासाठी अनुदान

गोमन्तक डिजिटल टीम

Millet Farming Awareness in Goa: राज्यात पूर्वापार नाचणी या भरड धान्याचे पीक घेतले जाते. पंरतु आता लागवडीत घट झाली असून शेतकऱ्यांनी नाचणी पिकाची लागवड करावी यासाठी कृषी संचालनालयाद्वारे १५ एप्रील पासून जागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे कृषी संचालक नेविल आल्फोन्सो यांनी सांगितले.

नाचणीचे पीक प्रामुख्याने राज्यातील डोंगराळ भाग असणाऱ्या काणकोण, केपे, डिचोली, पेडणे, सत्तरी, आदी भागात पिकते.

नाचणीचे उत्पादन घेणाऱ्या गावांमध्ये जाऊन जागृती करत शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी प्रोत्साहित करणार, असे कृषी संचालक नेविल आल्फोन्सो यांनी सांगितले.

कृषी संचालनालयाचे प्रयत्न

जगभरात आणि भारतात भरड धान्याच्या अनुषंगाने महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. शेतकऱ्यांनी पुन्हा आपल्या पारंपरिक शेतीकडे वळावे, पौषक भरड धान्याची लागवड करावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

गोव्यात देखील कृषी संचालनालयाद्वारे भरड धान्यांच्या लागवडीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

शेतकऱ्यांनी घ्यावे नाचणीचे पीक

शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नाचणी पीक घ्यावे, यासाठी शेतकऱ्यांना मोफत नाचणीचे बियाणे देण्यात येणार आहे.

त्यासोबतच नांगरणीसाठी तसेच पिकाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कुंपनासाठी शेतकऱ्यांना कृषी संचालनालयाद्वारे अनुदान देण्यात येईल.

त्यासोबतचा नव तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने देखील शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्यात येणार असल्याचे संचालक आल्फोन्सो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT