Milk Supply Dainik Gomantak
गोवा

Goa Milk Supply : दूध पुरवठा होणार सुरळीत; सुभाष शिरोडकरांचे स्पष्टीकरण

येत्या महिन्यात गोवा दुग्ध उत्पादन सोसायटीतर्फे गोव्यात दूध पुरवठा सुरळीत केला जाईल, असे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

दैनिक गोमन्तक

सासष्टी : येत्या महिन्यात गोवा दुग्ध उत्पादन सोसायटीतर्फे गोव्यात दूध पुरवठा सुरळीत केला जाईल, असे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

गेल्या काही महिन्यांपासून दूध पुरवठ्यामध्ये खंड पडत होता, हे मान्य करून मंत्री शिरोडकर यांनी सांगितले, की दुग्ध उत्पादन सोसायटीची कार्यकारिणी नसल्याने काम व्यवस्थित होत नव्हते. कामात सुसूत्रता नव्हती.

आता राजेश फळदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली नवी कार्यकारी समिती कार्यरत झाली असून त्यांच्यामार्फत दूध पुरवठा सुरळीत करण्यासाठीचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. सोसायटीला दूध पुरवठा गरजेपेक्षा कमी होत असल्यानेही पुरवठ्यात अनियमितपणा आला आहे. मात्र आता सोसायटीला दूध पुरवठ्यासाठी नव्याने प्रक्रिया सुरू केली आहे, असेही शिरोडकर म्हणाले.

दरम्यान, गुजरात सहकारी दूध विपणन महासंघातर्फे ‘अमूल’च्या दुधाच्या दरात प्रति लिटरमागे 2 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गोव्यातही अमूलच्या दूध दरामध्ये वाढ होणार आहे. ग्राहकांना आता आज बुधवारपासून 59 रुपयांऐवजी 61 रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागणार आहेत.

कोल्हापूरातील वारणा दूध संघाने दोन रुपये प्रति लिटरमागे 1 ऑगस्टला वाढ केली होती. आता अमूलनेही वाढ केली आहे. परंतु कर्नाटकातून येणाऱ्या विविध दूध संघांच्या दरामध्ये वाढ झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: 8 चौकार, 3 षटकार! गोव्याच्या 'तनिषा'ची वादळी खेळी व्यर्थ; आंध्र प्रदेशचा 18 धावांनी विजय

Goa News: 28 गुन्ह्यांचे अपराधीकरण झाले रद्द! गोवा राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; तुरुंगवासाऐवजी दंडाची तरतूद

Nagarjuna At IFFI 2025: '..अजूनही देशात शिवा म्हणूनच हाक मारतात'! अभिनेते नागार्जुन यांचा दिलखुलास संवाद; उलगडला भावनिक प्रवास

मित्र मित्र गेले पोहायला, पाण्याचा अंदाज न आल्याने ओढवले संकट; दूधसागर नदीत बुडालेल्या 15 वर्षीय मुलाचा सापडला मृतदेह

Horoscope: प्रवास, संधी आणि नवीन दिशा! विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम; व्यवसायिक लाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT