Milind Naik Dainik Gomantak
गोवा

Milind Naik: माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे; म्हणूनच माझी निर्दोष मुक्तता

माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्यामुळे माझी निर्दोष मुक्तता झाली असल्याचे मत मुरगावचे आमदार मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमन्तक

Milind Naik: 'माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून माझे व पक्षाचे नाव बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधकांनी रचले होते. यामुळे माझ्या पूर्ण कुटुंबाला खूपच मानसिक त्रास सोसावा लागला. अखेर गृह विभागाकडून माझ्या विरुद्ध केलेल्या आरोपात काहीच सिद्ध न झाल्याने सर्व आरोपांतून मला मुक्त करण्यात आल्याची माहिती' मुरगावचे आमदार मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी दिली. मला देवावर पूर्ण विश्वास होता, म्हणून भाजपने मला पुन्हा एकदा मुरगावची उमेदवारी दिली. पण यात मुरगाववासियांबरोबर कार्यकर्त्यांचा महत्वाचा वाटा असल्याची माहिती नाईक दिली.

राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप सहाजिकच होतच असतात. पण विरोधकांनी माझ्याविरुद्ध केलेले आरोप राजकीय व्यासपीठावर शोभत नसल्याची माहिती मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी दिली. निवडणूका येतात जातात पण सूडबुद्धीने केलेले खाजगी आरोप राजकीय क्षेत्रात योग्य नसल्याचे ते म्हणाले. डिसेंबर 2021 मध्ये माझ्यावर केलेल्या आरोपात माझा कोणताही संबंध नसल्याचे मी पक्षश्रेष्ठींकडे मांडले होते. गोव्याच्या 61 व्या मुक्ती दिनी (Goa Liberation Day) पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) राज्यात येणार म्हणून विरोधकांनी माझ्याविरुद्ध खालच्या दर्जाचे राजकारण केले. यामुळे माझ्या पूर्ण कुटुंबाला खूपच मानसिक त्रास सोसावे लागले. नंतर माझ्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यामुळे मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. एवढे करून सुद्धा विरोधकांनी माझ्याविरूद्ध षडयंत्र सुरूच ठेवले होते. अखेर राज्य महिला पोलिसांनी माझ्या विरोधात केलेले सर्व आरोप फेटाळून लावल्यानंतर विजय सत्याचा झाला असल्याची माहिती मिलिंद नाईक यांनी दिली. मला देवाबरोबर भाजपवर (BJP) पूर्ण विश्वास होता, म्हणून पुन्हा एकदा मुरगावतून भाजपची उमेदवारी जाहीर केली. माझा राजकीय कारकिर्दीत मुरगावच्या विकासाला मी सर्वप्रथम प्राधान्य दिलेले आहे.

स्व.मनोहर भाई पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या आशीर्वादामुळे मूरगावात अनेक प्रकल्प राबवले. त्याच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे मुरगावात विविध प्रकल्प मार्गी लावले. भाईच्या छत्रछायेत राजकारणाचे बारकाईने अभ्यास केल्यामुळे सडा, जेटी, बोगदा येथे युवकांसाठी मैदाने उभी केली. सडा भागात पालिकेचे मार्केट, वास्को, बायणा - गांधीनगर पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचा उड्डाणपूल म्हणजे मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न, एका प्रकारे पूर्ण केल्याचे मला समाधान वाटते. पर्रीकरामुळे बायणा, सडा, भागातील आणि अंदाजे 350 घरे राष्ट्रीय महामार्गामुळे पाडण्यापासून वाचवली असून याचे पूर्ण श्रेय स्व. मनोहर पर्रीकर यांना जाते असे मिलिंद नाईक यांनी सांगितले. मुरगाव सडा, जेटी, बोगदा, रुमडावाडा येथील रहिवाशांना प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचे स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी स्वीकारली आहे. जनतेचे आरोग्य महत्त्वाचे असल्याने या भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. सडा, जेटी, रुमडावाडा, बोगदा भागातील जनतेला अनेक वर्षा पासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आले याचे मला समाधान वाटते. या भागातील रहिवाशांनी पाण्यासाठी खूपच त्रास सोसावे लागत होते. अखेर यात यश असल्याची माहिती मिलिंद नाईक यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT