Cargo Flight At Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: मोपा विमानतळाच्या शिरपेचात नवा बहुमान, पहिल्या मालवाहू विमानाचे यशस्वी लँडिंग

Pramod Yadav

उत्तर गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (GOX) पहिल्या मालवाहू विमानाचे यशस्वी लँडिंग झाले आहे. विमानातून 25 टन संरक्षण श्रेत्राशी संबधित उपकरणांची वाहतूक करण्यात आली. बुधवारी हे मालवाहू विमान मोपावर दाखल झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत विमातळावरील सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 22 टनाच्या साहित्यासह पहिले मालवाहू विमान सुरक्षितपणे उतरले. याबाबत मी विमानतळावरील ग्राउंड स्टाफ आणि विमानतळ प्राधिकरणाचे अभिनंदन करतो व यशस्वी भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा देतो, अशा शब्दात मुख्यमंत्री सावंत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी या मालवाहू विमान दाखल झाल्यापासून माल हातळणीचा सविस्तर व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.

चॅपमन फ्रीबॉर्न आणि BBN एअरलाइन्स द्वारे चालवलेले A321 मालवाहू विमानाने मोपा विमानतळावर दाखल होण्यापूर्वी बेल्जियम ते शारजाह असा प्रवास केला.

मालवाहू विनान मोपाच्या कार्गो टर्मिनलवर लँड झाल्यानंतर तेथील सर्व हाताळणी जीएमआर गोवा टीमने केली. माल खाली केल्यानंतर विमान शारजाहला परतीचा प्रवास करणार आहे.

मोपावरील कार्गो हाताळणी क्षमता तपासणीसाठी ही महत्वाची फ्लाईट होती, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

SCROLL FOR NEXT