Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: दाबोळीवर मिग-29 फायटर जेटचा अपघात; 11 फ्लाईट डायव्हर्ट केल्यानंतर विमानसेवा पूर्ववत

दाबोळी विमानतळावरील धावपट्टी दुपारी 3.30 पर्यंत लँडिंगसाठी बंद करण्यात आली होती. 4.15 वाजता सेवा पूर्ववत झाली.

Pramod Yadav

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर आज दुपारी मिग-29 या लढाऊ विमानाचा टायर फुटल्याची घटना घडली. सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही. टायर फुटल्याने येथे आग लागली होती. पण, विमानतळ प्रशासनाने तत्काळ नियंत्रण आणले.

दरम्यान, या प्रकारानंतर दाबोळी विमानतळावरील धावपट्टी दुपारी 3.30 पर्यंत लँडिंगसाठी बंद करण्यात आली होती. 4.15 वाजता सेवा पूर्ववत झाली. विमानतळ संचालक धनंजय राव यांनी ही माहिती दिली.

विमानतळावर अपघात झाल्यानंतर दुपारी 3.30 पर्यंत धावपट्टी बंद ठेवण्य़ात आली होती. यामुळे दाबोळीवरील याकाळातील विमान मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळविण्यात आली होती. दरम्यान, सध्या दाबोळीवरील विमानसेवा पूर्ववत झाली आहे.

दीड वर्षापूर्वीही घडला होता प्रकार

दीड वर्षभरापूर्वी असाच प्रकार घडला होता. एका प्रवासीवाहक विमानाने उड्डाण केल्यानंतर चाकांना आग लागल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखून तत्काळ लैंडिंग केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT