Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Dacoity in Baina: डोक्यात वार, लहान मुलीलाही मारहाण; 'रॉड' आणि 'सुरा' घेऊन 7 हल्लेखोर घरात, बायणात मध्यरात्री भीषण दरोडा

Baina crime news: दक्षिण गोव्यातील बायणा परिसरात सातव्या मजल्यावर एका कुटुंबावर भीषण दरोडा पडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली

Akshata Chhatre

बायणा: दक्षिण गोव्यातील बायणा परिसरात सोमवार, १७ नोव्हेंबरच्या मध्यरात्री चामुंडी आर्केड इमारतीच्या सातव्या मजल्यावर एका कुटुंबावर भीषण दरोडा पडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शस्त्रे आणि रॉड घेऊन आलेल्या सात हल्लेखोरांनी घरात घुसून कुटुंबीयांना बेदम मारहाण करत लूट केली.

रॉडने हल्ला, लहान मुलीलाही मारहाण

घरातील महिलेने दिलेल्या माहितीनुसार, रात्री २:४५ च्या सुमारास घराच्या मागील बाजूने दरोडेखोर घरात घुसले. दरोडेखोरांनी घरात लूट सुरू असताना तिच्या पतीला बेदम मारहाण केली. दरोडेखोरांनी पतीच्या डोक्यावर रॉडने हल्ला केला, ज्यामुळे डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला.

तसेच, पत्नी आणि त्यांच्या लहान मुलीलाही चपलांनी मारहाण करण्यात आली. जखमी झालेल्या घरमालकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यास सुरा खुपसून जीवे मारण्याची धमकी हल्लेखोरांनी दिली असल्याचं देखील ती म्हणालीये.

दिवाळीतील दागिने आणि रोकड लंपास

दरोडेखोरांनी घरात केवळ १५ ते २० मिनिटांत लूट केली. या दरम्यान त्यांनी घरातील मंडळींना बांधून ठेवले आणि रोख रक्कम, दिवाळीच्या वेळी घरात असलेले सोन्याचे दागिने, देवाची भांडी आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन पळ काढला.घरातील महिलेने दिलेल्या माहितीनुसार, हे हल्लेखोर डोक्यावर हेल्मेट घालून आले होते आणि ते बिहारी भाषेत बोलत होते.

तपास सुरू; एसपी दक्षिण गोवा

या घटनेची माहिती मिळताच दक्षिण गोव्याचे एसपी, डीवायएसपी आणि विविध पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टीकम सिंग वर्मा यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी तातडीने पथके तैनात करण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: वैयक्तिक संबंध अन् शाळेत फोन वापरल्याचा खोटा आरोप; बार्देश येथे शिक्षिकेकडून 17 वर्षीय विद्यार्थिनीचा मानसिक छळ, गुन्हा दाखल

मी आयुष्याला कंटाळलीये! जीवन संपविण्यासाठी महिलेने गोव्याच्या समुद्रात घेतली उडी, जीवरक्षकाने दिले जीवदान

कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर हैदराबादच्या 23 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; Video

Divjotsav 2025: 25-30 वर्षांपूर्वी गोव्यात चिकण मातीचेच दिवे दिसायचे, पितळीच्या दिवजांची वाढती संख्या; बदलता दिवजोत्सव

Viral Video: हातात बेड्या, शेजारी पोलिस तरीही बेभान होऊन नाचला; मित्राच्या लग्नासाठी जेलमधून आला सरदार भावड्या

SCROLL FOR NEXT