Mickky Pacheco Dainik Gomantak
गोवा

'आरजी हे सतीश धोंड यांनी जन्माला घातलेले बाळ'

मिकी पाशेकोंचा निशाणा, राज्यात पक्ष प्रभावहीन असल्याची टीका

दैनिक गोमन्तक

मडगाव : ‘आरजी’ या पक्षाला कुणी फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. गोव्यात हा पक्ष प्रभावहीन असून ‘आरजी’ हे भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनी जन्माला घातलेले बाळ आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नुवेचे उमेदवार मिकी पाशेको यांनी केला. (Mickky Pacheco News Updates)

मिकी पाशेको (Mickky Pacheco) यांनी काल आपला उमेदवारी अर्ज भरला. नुवेत कुणीच माझ्याशी स्पर्धा करू शकत नाही. आप आणि तृणमूल (TMC) हे धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पाडण्यासाठीच मैदानात उतरले आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. ‘आरजी’ हा तर सतीश धोंड यांनी तयार केलेला पक्ष आहे. दक्षिण गोव्यातील ख्रिस्ती मतांमध्ये फूट पाडण्यासाठीच सतीश धोंड यांनी मनोज परब यांना पुढे आणले होते. आता तेच ‘पोगो, पोगो’ करत सगळीकडे फिरत आहेत, असे पाशेको म्हणाले.

काँग्रेसचे (Congress) उमेदवार आलेक्स सिक्वेरा यांच्याविषयी पाशेको म्हणाले, 2012 सालच्या निवडणुकीत मी त्यांना पराभूत केले होते. त्यावेळीच ते शरीराने थकले होते. अशा माणसाला 10 वर्षांनंतर उमेदवारी देऊन काँग्रेसने काय साध्य केले, तेच कळत नाही. त्यांना 100 मीटर चालले तरी थकवा येतो, असे पाशेको म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fire In Gujarat Titans Team Bus: फायनलनंतर मोठी दुर्घटना! गुजरातच्या बसला आग; शुभमन गिल, बटलरसह सर्व खेळाडू 1 तास रस्त्यावर! वाचा नेमकं काय घडलं?

Goa Tourist Car Stunt: एकाच कारमध्ये 10 तरुण, दोघे चक्क डिकीच्या आत; बागा रोडवर पर्यटकांचा थरारक स्टंट! व्हिडिओ व्हायरल

LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांना मोठा दणका, गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ; आजपासून नवे दर लागू

Horoscope: जूनचा पहिलाच दिवस 'या' राशींसाठी ठरणार 'गोल्डन डे'; करिअरमध्ये सुवर्णसंधी, बँक बॅलन्स वाढणार

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

SCROLL FOR NEXT