Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा

विरोधकांच्या मतदारसंघातही विकासकामे करा : लोबो

लोबो यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

दैनिक गोमन्तक

पणजी : विरोधी आमदारांच्या मतदारसंघामध्ये कामांकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. संबंधित खात्याचा मंत्री किंवा अधिकारी कामानिमित्त जेव्हा एकाद्या मतदारसंघात येणार असेल, तर आमदाराला किमान दोन दिवसांपूर्वी सूचित करण्यात यावे आणि यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लक्ष घालावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केली.

लोबो यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिष्टमंडळात हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुश फरेरा, सांताक्रुझचे आमदार रुदाल्फ फर्नांडिस, शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, साळगावचे आमदार केदार नाईक, केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा यांचा समावेश होता.

मान्सून सुरू झाला असला तरी अजून मान्सपूर्व कामे अनेक ठिकाणी पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे लोकांना समस्यांना सामोरे जायला लागत आहे. यात विरोधी आमदारांच्या मतदारसंघामध्ये काही समस्या निर्माण झाल्या असल्याचेही मुख्यमंत्री सावंत यांच्यासमोर या अडचणी मांडल्या. विरोधी आमदारांच्या मतदारसंघातील पंचायत घरांमध्ये पाण्याची गळती होत असल्याच्या घटना घडत आहे. अशा घटनांकडे मुख्यमंत्री सावंत यांनी लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना ही कामे करण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती लोबो यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT