MLA Michael Lobo And Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'मला तो स्वार्थ खरा दिसायला लागलाय'; लोबोंनी केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कौतुकावर सरदेसाईंनी लावला तर्क

Goa Assembly Session 2025: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ फेरविस्ताराच्या चर्चा सुरु आहेत.

Pramod Yadav

पर्वरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला स्वंयपूर्ण आणि आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने काम करतायेत. त्याच उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील काम करतायेत, अशा शब्दात कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे कौतुक केले. लोबोंनी केलेल्या कौतुकाचा आमदार विजय सरदेसाईंनी रोचक तर्क लावला. या तर्कावर मायकल यांनी देखील हसत प्रतिक्रिया दिली.

मायकल लोबो अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत होते. "मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यात संत फ्रान्सिस झेवियर शवदर्शन सोहळ्याचे यशस्वीरित्या आयोजन केले. यासाठी आवश्यक सुविधा पुरवल्या. गोव्याचा जीएसडीपी देखील वाढला आहे", असे लोबो बोलताना म्हणाले. "मुख्यमंत्री सावंत गोव्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी काम करत आहेत. त्यांनी अनेक गोष्टी मार्गी लावल्या, रोजगार उपलब्ध करुन दिला", असे लोबो म्हणाले.

लोबो बोलत असताना आमदार विजय सरदेसाईंनी, "मायकल स्वयंपूर्ण... आत्मनिर्भर.. अशा मुद्यांवर बोलू लागलेत. तुम्ही म्हटला तसे मला तो स्वार्थ खरा दिसायला लागलाय", असा तर्क विजय सरदेसाई यांनी सभागृहात बोलून दाखवला. मायकल यांनी देखील यावर हसत हसत सध्यातरी मी या शर्यतीत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ फेरविस्ताराच्या चर्चा सुरु आहेत. सभापती रमेश तवडकरांनी काही दिवसांपूर्वी पुढील १५ दिवसांत याबाबत निर्णय होईल, असे सूचक विधान केले होते. तवडकरांनी दिलेल्या यादीत मायकल यांचे देखील नाव होते. त्यामुळे विजय सरदेसाईंनी यांनी मायकल यांच्याबाबत लावलेला तर्क मंत्रिमंडळ फेरविस्ताराला धरुन असल्याचे दिसते दरम्यान, लोबो यांनी ते या शर्यतीत नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, डबल इंजिन सरकारने राज्यात विकास केल्याचा दावा लोबो यांनी सभागृहात केला. विजय सरदेसाई यांना फातोर्डात हवा असलेला पूल देखील सरकारने केल्याचे लोबो म्हणाले. दरम्यान, तो नितीन गडकरी यांनी केल्याचे सरदेसाई म्हणाले. राज्यपाल व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत. त्यांनी सर्व मतदारसंघाचा दौरा केलाय, अनेक स्तरातील लोकांना त्यांनी मदत केलीय, असे मायकल लोबो राज्यपालांचे कौतुक करताना म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT