Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

मंदिर पुनर्बांधणीपेक्षा मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासावर भर द्यावा

पोर्तुगीजांनी मंदिरे उद्ध्वस्त केली नाहीत; मायकल लोबोंचा दावा

दैनिक गोमन्तक

पणजी : किनारपट्टीच्या राज्यात पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणी आणि नूतनीकरणाच्या सत्ताधारी भाजपने ठेवलेल्या प्रस्तावापेक्षा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत करावे, असे गोवा काँग्रेसने म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते मायकल लोबो म्हणाले, की मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला आमचा कोणताही विरोध नाही, आमचा पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो, परंतु राज्य सरकारचे लक्ष विकासावर असणे आवश्यक आहे. राज्यात पोर्तुगीजांनी कोणतीही मंदिरे उद्ध्वस्त केलेली नाहीत.

कोणतीही मंदिरे नष्ट झालेली नाहीत. काही मंदिरे होती जी एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवली गेली आणि ती पुन्हा बांधली गेली. मंदिरे पुन्हा बांधली जात असतील, तर मी म्हणेन की आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. मुख्यमंत्र्यांना काही मंदिरांचे काम करायचे असेल, तर ठीक आहे. पण राज्याच्या विकासावर त्यांनी अधिक भर द्यावा.

गोव्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनविण्यावर भर देणारे मुख्यमंत्री सावंत किनारपट्टीच्या राज्यात मंदिर पर्यटनाला चालना देण्यावर भर देत आहेत. समृद्ध सांस्कृतिक वारसा खेड्यांमध्ये शोधण्याची गरज आहे आणि लोकांना समुद्रकिनाऱ्यापासून मंदिरांपर्यंत नेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT