Michael Douglas receive Satyajit Ray Lifetime Achievement Award at IFFI Goa 2023 
गोवा

Michael Douglas: हॉलीवूड अभिनेते मायकल डग्लस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान

गोव्यात आयोजित ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मंगळवारी समारोप पार पडला.

Pramod Yadav

Michael Douglas: हॉलीवूड अभिनेते मायकल डग्लस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोव्यात आयोजित ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मंगळवारी समारोप पार पडला, यावेळी डग्लस यांना या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी व्यासपीठावर बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणा उपस्थित होता.

Michael Douglas receive Satyajit Ray Lifetime Achievement Award at IFFI Goa 2023

इफ्फीच्या समारोपासाठी मायकल डग्लस यांची पत्नी नामवंत अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या कॅथरिन झिटा जोन्स, त्यांचा मुलगा अभिनेता डायलन डग्लस हे देखील उपस्थित होते.

प्रतिष्ठेचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार मिळणे हा आपला मोठा सन्मान आहे. सत्यजित रे यांच्या पथेर पांचाली आणि चारुलता सारख्या चित्रपटांचा चित्रपट प्रशिक्षणा दरम्यान अभ्यास केला होता, असे डग्लस म्हणाले.

मायकल डग्लस यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यात दोन अकादमी पुरस्कार, पाच गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक एमी पुरस्कार यांचा यात समावेश आहे.

डग्लस यांना या पुरस्काराबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

Wild Vegetables: पावसाळ्यातील किमया! गोव्यातील चविष्ट रानभाज्या..

'कोणतरी मरत नाही तोपर्यंत सरकार लक्ष देणार नाही'; मनसे नेत्याने शेअर केला कशेडी बोगद्याचा धक्कादायक व्हिडिओ

Shravan 2025: 'श्रावण सोमवार' व्रत करणार असाल तर 'हे' नक्की वाचा! काय करावं, काय टाळावं? पूजेचे संपूर्ण नियम

SCROLL FOR NEXT