Divya Rane Dainik Gomantak
गोवा

Goa म्हाऊस गावाला दसरोत्सवामुळे एक वेगळी ओळख!

गावातील देवस्थान सभामंडपाची समस्या अजूनपर्यंत सुटलेली नाही.

दैनिक गोमन्तक

Mhaus: दसरोत्सवामुळे म्हाऊस गावाला एक वेगळी ओळख आहे. या गावातील देवस्थान सभामंडपाची समस्या अजूनपर्यंत सुटलेली नाही. यामुळे येणाऱ्या काळात ही समस्या सुटावी यासाठी प्राधान्यक्रमाने लक्ष देणार असल्याचे आश्वासन स्थानिक आमदार तथा गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. दिव्या राणे यांनी दिले.

म्हाऊस-सत्तरी येथील देवस्थानच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या खास सभेमध्ये त्या बोलत होत्या. या प्रसंगी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, देवयानी गावस, पंचायतीचे सरपंच सोमनाथ काळे, राधिका सावंत, स्थानिक पंच सुलभा देसाई, प्रीती गावकर, गुरुदास गावस, सयाजी सावंत, देवस्थानचे पुजारी व ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती. विनोद शिंदे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले.

डॉ. दिव्या राणे, आमदार-

या गावाच्या दसरोत्सवाला विशेष परंपरेचा वेगळाच साज लाभलेला आहे. दसरोत्सवानिमित्ताने हजारो भाविक या ठिकाणी देवदर्शनाचा लाभ घेतात त्यांना सभामंडपाची कमतरता भासते. लवकरच ही समस्या सोडविणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT