Goa housing scheme Dainik Gomantak
गोवा

'Mhaje Ghar Yojana: 'माझे घर'ला विरोध करणाऱ्यांना जवळ करू नका!- मुख्यमंत्री

Mhaje Ghar Yojana Goa: सर्वसामान्यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांमध्ये त्यांना व पुढील पिढीला सुखासमाधानाने राहता यावे यासाठी ही योजना मार्गी लावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Akshata Chhatre

वास्को (प्रतिनिधी): सर्वसामान्य गोवेकरांसाठी असलेल्या 'माझे घर' योजनेला विरोध करणाऱ्यांना जवळ करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे मंगळवारी (ता.१४) एका कार्यक्रमात केले. सर्वसामान्यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांमध्ये त्यांना व पुढील पिढीला सुखासमाधानाने राहता यावे यासाठी ही योजना मार्गी लावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच सडा भागातील गोवा राज्य पुनर्वसन बोडांच्या वसाहतीतील सदनिकांचा मालकी हक्क संबंधितांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथील रवींद्र भवनात आयोजित या कार्यक्रमाला मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर, दक्षिण गोवाच्या जिल्हाधिकारी एमा क्लिट्स, मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली, संयुक्त मामलेदार जान्हवी केळेकर, गोवा राज्य पुनर्वसन बोडांचे सदस्य सचिव आलेक्स डिकॉस्ता, रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव उपस्थित होत.

"जो घर बांधतो. त्याची एकच इच्छा असते की, आपल्यानंतर आपल्या पुढील पिढीलाही या घराचा आसरा मिळाला पाहिजे. त्यांची ती ईच्छा आता पूर्ण होणार आहे. असे डॉ. सावंत यांनी सांगितले. या प्रसंगी सागर नाईक, चंद्रशेखर परब, तुळशीदास खवणेकर, संध्या मसुरकर आदींना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते योजनेचे फॉर्म देण्यात आले.

...तर मला फोन करा : मुख्यमंत्री

एखाद्याचे घर रस्त्याकडेला असेल, तर त्या घरालाही संरक्षण मिळेल, ते सार्वजनिक बांधकाम खात्याला पाडता येणार नाही. जर गरजच असले तर नुकसान भरपाई द्यावी लागेल किंवा दुसरीकडे सोय करावी लागेल. 'माझे घर'साठी पालिकेने निर्धारीत वेळेत दाखले दिले नाहीत, तर थेट मला फोन करा, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

'माझे घर' योजना हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यामुळे माझे घरची संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. जेणेकरून लोकांना घराचा मालकी हक्क मिळणार आहे. जेणेकरून घर पाडण्यात येईल हे त्यांच्या मनातील भय दूर होणार आहे. मुरगावात बहुतांश घरे सरकारी जमिनीवर असल्याने लोकांना दिवाळीची ही भेट मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT