Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Mhaje Ghar: ...तर ‘माझे घर’ योजनेचे लाभार्थी पडतील त्रासात! विरियातोंचा गंभीर इशारा; सरकारच्‍या धोरणांवर साधला निशाणा

Viriato Fernandes: मतदारसंघातील लोकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून मार्गदर्शन केले जाईल. आता लोकांना मडगावला जाण्याची गरज नाही, असे फर्नांडिस म्‍हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: सरकारकडे अवैध बांधकामांची कोणतीही अधिकृत माहिती नाही. ‘माझे घर’ योजनेच्या माध्यमातून ती माहिती गोळा केली जात आहे. परंतु न्यायालयाचा निकाल या योजनेच्या विरोधात गेल्यास संबंधित रहिवासी त्रासात पडतील, असा गंभीर इशारा काँग्रेसचे दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी दिला.

मुरगाव तालुक्यात नव्याने सुरू केलेल्या आपल्या कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी शनिवारी पत्रकार परिषदेत फर्नांडिस बोलत होते. या कार्यालयाचे उद्‌घाटन माजी उपनगराध्यक्षा शांती मांद्रेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दक्षिण गोवा काँग्रेस अध्‍यक्ष सावियो डिसिल्वा, प्रदेश सरचिटणीस राजेश वेरेकर, ओबीसी विभाग अध्‍यक्ष नितीन चोपडेकर, दाबोळी काँग्रेस अध्‍यक्ष गोपी नाईक, माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

दरम्‍यान, आपल्‍या नवीन कार्यालयातून मुरगाव, वास्को, दाबोळी व कुठ्ठाळी मतदारसंघातील लोकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून मार्गदर्शन केले जाईल. आता लोकांना मडगावला जाण्याची गरज नाही, असे फर्नांडिस म्‍हणाले.

लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्र लढलो. पण आता तो पक्ष काँग्रेसवर टीका करत आहेत. यामागे कोणते राजकारण आहे? असा सवाल कॅ. फर्नांडिस यांनी उपस्‍थित केला. फोंड्याचे भावी आमदार राजेश वेरेकर असतील, असे सूचक विधानही त्‍यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT