Vijai Sardeai, Viresh Borkar, Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

‘माझे घर’ हा केवळ परप्रांतीयांची ‘व्‍होटबँक’ जपण्‍यासाठी खटाटोप! विजय, मनोज, विरेश यांचे मत; विरोधकांच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप

Mhaje Ghar: सभागृहात घडणाऱ्या घडामोडींचा संदर्भ सार्वजनिक ठिकाणी देणे चुकीचे असल्‍याचा विसर सभापतीपद भूषवलेल्‍या मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पडला आहे का? असा सवाल आमदार सरदेसाई यांनी केला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: परप्रांतीयांची ‘व्‍होटबँक’ जपण्‍यासाठीच सरकारने ‘माझे घर’ योजना मार्गी लावली आहे. स्‍थानिकांपेक्षा परप्रांतीयांनाच या योजनेचा अधिक फायदा मिळणार आहे. योजनेअंतर्गत विविध मतदारसंघांत आयोजित कार्यक्रमात मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत विरोधी पक्षांची नावे घेऊन विरोधी आमदारांच्‍या अधिकारांवर गदा आणू पाहत आहेत.

त्‍यामुळे याबाबत आम्‍ही राज्‍यपाल पी. अशोक गजपती राजू यांची भेट घेणार असल्‍याची माहिती गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई, ‘आरजी’चे अध्‍यक्ष मनोज परब आणि आमदार विरेश बोरकर यांनी दिली. पर्वरीत सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘माझे घर’ योजनेचा परप्रांतीयांपेक्षा स्‍थानिक जनतेला लाभ मिळावा यासाठी ही योजना केवळ गोमंतकीय जनतेसाठी मार्गी लावण्‍याची मागणी आम्‍ही विधानसभेच्‍या गत पावसाळी अधिवेशनात केली होती. परंतु, सरकारने ही योजना सर्वांसाठीच चालीस लावण्‍याचा निर्णय घेतल्‍यामुळे आम्‍ही योजनेला विरोध दर्शवला.

विधानसभा सभागृहात जनतेच्‍या हक्‍कांसाठी सत्ताधाऱ्यांशी भांडणे हे विरोधी आमदारांचे कर्तव्‍य असते. त्‍यामुळे सभागृहात घडणाऱ्या घडामोडींचा संदर्भ सार्वजनिक ठिकाणी देणे चुकीचे असल्‍याचा विसर सभापतीपद भूषवलेल्‍या मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पडला आहे का? असा सवाल आमदार सरदेसाई यांनी केला. ‘माझे घर’ योजनेच्‍या कार्यक्रमांना स्‍थानिकांपेक्षा परप्रांतीयांचीच गर्दी अधिक असते.

अशा ठिकाणी ते जाहीरपणे आमच्‍या पक्षांची नावे घेत विरोधी आमदारांच्‍या अधिकारांवर गदा आणण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. त्‍यामुळे याबाबत आम्‍ही राज्‍यपालांची भेट घेऊन या घडामोडी त्‍यांच्‍या कानावर घालणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. सरकारने ‘माझे घर’ घर योजना केवळ परप्रांतीयांसाठी राबवली आहे. या योजनेचा ८० टक्‍के परप्रांतीयांना आणि केवळ २० टक्‍के स्‍थानिकांना होणार आहे. ज्‍यांनी गोव्‍यातील जमिनी लाटल्‍या, त्‍यांचीच घरे सरकार कायदेशीर करीत आहेत. त्‍यातून ही योजना केवळ परप्रांतीयांच्‍या मतांसाठीच असल्‍याचे सिद्ध होते, असे मनोज परब म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: इंग्लंडला डबल झटका! आधी कांगारुंनी मैदानात दिली मात, नंतर WTC पॉइंट टेबलमध्ये झाली घसरण; जाणून घ्या भारताची सध्याची स्थिती

गोव्यात जमीनमालकांना झटका! मुंडकारांना हक्क मिळेपर्यंत जमिनीची विक्री होणार नाही; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Shani Gochar: 2026 नव्हे 2027 मध्ये होणार शनिदेवाचे राशी परिवर्तन, 'या' 5 राशींना राहावं लागणार सावधान; आरोग्य, धन आणि संबंधांवर थेट परिणाम!

Baba Vanga Predictions: 2026 मध्ये 'या' 5 राशीचे लोक होणार मालामाल, बाबा वेंगांची 'अफाट धनलाभा'ची भविष्यवाणी; शनिदेवाची राहणार कृपा!

IFFIESTA: संगीतप्रेमींनो, IFFI घेऊन आलंय 3 धमाकेदार कॉन्सर्ट्स पूर्णपणे मोफत; कधी आणि कुठे? सविस्तर माहिती येथे!

SCROLL FOR NEXT