बेळगाव: खानापूर तालुक्यात येणाऱ्या म्हादई आणि कळसा-भांडुरा प्रकल्पांमुळे वनसंपदेला धोका निर्माण झाला आहे. हे प्रकल्प थांबवावेत, अशी मागणी ‘आमचे पाणी आमचा हक्क, आमचे जंगल आमची जमीन’ संघटनेतर्फे पर्यावरणप्रेमींनी मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देण्यात आले.
पश्चिम घाटामुळे कर्नाटकात पाऊस येतो, या वनसंपदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सरकारकडून हाती घेण्यात आलेल्या पाणी वाढवण्याच्या महादाई व कळसा भंडुरा या प्रकल्पामुळे पश्चिम घाटाचे मोठे नुकसान होणार आहे. या प्रकल्पासह ‘हिडकल डॅम’चे पाणी हुबळी-धारवाडकडे वळवण्याच्या प्रकल्पाचा पर्यावरणप्रेमी संघटना आणि शहरवासीयांनी निषेध केला.
जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या सरकार दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले. यावेळी दिलीप कामत, शिवाजीराव कागणीकर, कॅ. नितीन धोंड, अमृत चरंतीमठ, लिंगराज जगजंपी, सुरेश हुबळीकर, नाईला कोयलो, शारदा गोपाळ, सुजित मुळगुंद, राजू टोपन्नावर, रमाकांत कोंडूस्कर, शेतकरी नेते हजर होते.
दुसरीकडे, म्हादईसंदर्भात बेळगाव येथील मोर्चाची आम्हाला माहिती उशिरा मिळाली, अन्यथा आम्हीही सहभागी झालो असतो. सध्या आम्ही त्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असून, त्यांना गोव्यात (Goa) बोलावणार आहोत. येथेही एक मोठा मोर्चा आणि आंदोलन उभारणार आहोत. कर्नाटक आणि गोवा यांच्या संयुक्त बैठकीद्वारे मार्ग काढायचा आमचा प्रयत्न आहे, असे राजन घाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गोव्याच्या म्हादई नदीचे रक्षण आणि म्हादई वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यासाठी तातडीने कृती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजन घाटे यांनी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, उच्च न्यायालयाने (High Court) म्हादईसाठी व्याघ्र प्रकल्प क्षेत्र जाहीर करण्यास मान्यता दिली आहे, मात्र तरीही हा निर्णय अद्याप अंमलात आला नाही, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.