Goa Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mhadai Hearing: म्हादईचा 'सर्वोच्च' निर्णय गोव्यासाठी खर्चिक? गोवा-कर्नाटकच्या कायदेशीर लढ्यात विलंब

Mhadai Dispute: हा वाद आता सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊन पोहोचलाय मात्र तरीही अजून या वादावर काही सुनावणी होत नाहीये

Akshata Chhatre

पणजी: गोवा आणि कर्नाटक यांच्यामध्ये म्हादई नदीवरून वाद सुरु आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेला हा वाद आता सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊन पोहोचलाय मात्र तरीही अजून या वादावर काही सुनावणी होत नाहीये. हा खटला ६ फेब्रुवारी रोजी होईल अशी माहिती मिळाली होती मात्र आता सोमवारी (२९ जानेवारी) च्या यादीत देखील या खटल्याचे नाव नसल्याने यापुढे देखील विलंब होईल अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

शनिवार १ फेब्रुवारी रोजी मुख्य यादीतून वगळल्यानंतर या खटल्याची सुनावणी होईल, असा आशावाद सरकारी सूत्रांनी व्यक्त केला होता. पण तरीही पुरवणी यादीत देखील या खटल्याचे नाव नसल्याने यावर नेमकी कधी सुनावणी होईल यावर प्रश्नचिह्न कायमच आहे.

सुप्रिम कोर्ट सध्या गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांनी केलेल्या अर्जावर आणि गोवाने कर्नाटकाशी केलेल्या अवमान याचिकांवर विचार करत आहे. यापूर्वी या प्रकरणावर २०२३ मध्ये जुलै महिन्यात एक मोठी सुनावणी झाली होती, पण त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये निश्चित करण्यात आलेली सुनावणीही पुढे ढकलली गेली होती.

पुन्हा पुन्हा होणाऱ्या या विलंबामुळे गोव्यावर मोठा आर्थिक ताण आलेला आहे. गोव्याचे सुमारे १४ वकील प्रत्येक आठवड्यात दिल्लीला जातात. मुंबई आणि दिल्लीतील काही वकिलांना देखील यामध्ये जोडले गेले आहे, ज्यामुळे वकिलांची संख्या २० वर पोहोचली आहे. सरकारला दर सुनावणी दिवशी ८३,००० ते १ लाख रुपये खर्च येतो. प्रकरणाची सुरुवातीची सुनावणी २३ जानेवारीला ठरवली गेली होती, मात्र काही कारणांमुळे ती ३० जानेवारीवर ढकलली गेली होती आणि अजूनही म्हादईवर सर्वोच्य निर्णय झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT