Mhadai Hearing: 23 जानेवारीला होणार म्हादईवर 'सर्वोच्च' सुनावणी!!

Supreme Court On Mhadai Dispute: न्यायालय क्रमांक १ मध्ये सुनावणीसाठी हा विषय सूचीबद्ध केला आहे

पणजी: म्हादई नदीचे पाणी वळवल्यासंदर्भात गोवा सरकारने कर्नाटकविरोधात दाखल केलेल्या अवमान याचिकेसह इतर सर्व याचिकांवर येत्या २३ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांनी दाखल केलेल्या विशेष याचिकांवर तसेच अवमान याचिकांवर देखील सुनावणी होणार आहे. न्यायालय क्रमांक १ मध्ये सुनावणीसाठी हा विषय सूचीबद्ध केला आहे.

सरन्यायाधीश संजीव खन्ना,न्यायमूर्ती संजीव कुमार तसेच न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या पिठासमोर ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्यावेळी गोव्याकडून जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंते प्रमोद बदामी, अधीक्षक अभियंते दिलीप नाईक आणि वकिलांचा गट उपस्थित राहणार आहे, यासाठीच हा समूह दिल्लीसाठी रवाना होईल.

न्यायालयाकडून गोव्याच्या अवमान याचिकेसह लवादाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरही सुनावणी केली जाईल. सर्वोच्च न्यायाकडून होणाऱ्या या सुनावणीत गोव्याची सुनावणी ११७ व्या क्रमांकावर असल्याने गुरुवारी लवकर यावर निर्णय होण्याची शक्यता अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com