Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Sudin Dhavalikar: उड्या मारलेल्यांना पुन्‍हा 'मगो'ची उमेदवारी नाही! आमसभेत निर्णय घेणार'; मंत्री सुदिन ढवळीकर

Goa MGP: पक्षाचे महत्त्‍वाचे निर्णय आमसभेमध्‍येच होत असतात. त्‍यानुसार हा निर्णयही आमसभेतच घेतला जाईल, असे मंत्री तथा मगोचे ज्‍येष्‍ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

Sameer Panditrao

पणजी: ‘मगो’ पक्षाच्‍या उमेदवारीवर निवडून येऊन आमदार झालेल्‍या आणि नंतर इतर पक्षांमध्‍ये उडी मारलेल्‍यांना पुन्‍हा विधानसभेचे तिकीट न देण्‍याचा निर्णय मगोच्‍या आमसभेत घेतला जाणार असल्‍याची माहिती मंत्री तथा मगोचे ज्‍येष्‍ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

‘मगो’तर्फे प्रथम निवडून आलेल्‍या आमदाराने मंत्रिपद न घेता महामंडळाचे अध्‍यक्षपद स्‍वीकारण्‍याचा निर्णय याआधीच पक्षाने घेतला आहे. तो निर्णय यापुढेही कायम राहील, असे ढवळीकर म्‍हणाले. ‘मगो’च्‍या तिकिटावर निवडून येऊन अनेकांनी यापूर्वी इतर पक्षांमध्‍ये उड्या मारल्या आहेत.

असे प्रकार यापुढे घडू नयेत, यासाठीच ‘मगो’च्‍या उमेदवारीवर निवडून येऊन इतर पक्षांमध्‍ये गेलेल्‍यांना पुन्‍हा विधानसभा निवडणुकीची उमेदवारी न देण्‍याचा निर्णय पक्षाच्‍या आमसभेमध्‍ये घेण्‍यात येणार आहे. पक्षाचे महत्त्‍वाचे निर्णय आमसभेमध्‍येच होत असतात. त्‍यानुसार हा निर्णयही आमसभेतच घेतला जाईल, असे त्‍यांनी सांगितले.

दरम्‍यान, मगोच्‍या उमेदवारीवर प्रथमच निवडून येणाऱ्या आमदाराला सरकारात थेट मंत्रिपद न देता त्‍याला महामंडळाचे अध्‍यक्षपद देण्‍यात येईल. या आमदाराने त्‍या पदावर काम करून स्‍वत:ला सिद्ध करून दाखवावे, यासाठीच हा निर्णय आमसभेत घेण्‍यात आला होता. तो निर्णय कायम राहील, असेही त्‍यांनी नमूद केले.

‘त्यांनी’ तरी त्‍याच पक्षात रहावे!

राज्‍याचे मुख्‍यमंत्रिपद भूषवलेल्‍यांनी इतर पक्षांत जाणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे म्‍हणत मंत्री सुदिन ढवळीकर यांनी माजी मुख्‍यमंत्री दिगंबर कामत आणि लक्ष्‍मीकांत पार्सेकर यांचाही संदर्भ दिला. परंतु, हे आपले वैयक्तिक मत असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"50 हजार तालांव, 48 तास कोलवाळ जेल", दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या पर्यटकांवर लोबोंनी काढलाय 'जालीम' उपाय!

"पाकिस्तान पहलगामसारखा आणखी एक हल्ला करू शकतो", लेफ्टनंट जनरल मनोज कटियार यांचा इशारा; भारत प्रत्युत्तर देण्यास सज्ज

Viral Post: एका रात्रीसाठी 60 हजार, ओला - उबेर नाही; पर्यटकांची गोव्याकडे पाठ व्हिएतनाम, थायलंडला पसंती? पोस्ट चर्चेत

Viral Video: 'हा तर खरा देशी जुगाड'! हवा खाण्याची ही 'गंमतशीर ट्रिक' पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Arjun Tendulkar: IPL नंतर आता 'रणजी'मध्ये धमक दाखवणार सचिनचा लेक अर्जुन, 15 ऑक्टोबरपासून 'या' संघासाठी खेळताना दिसणार

SCROLL FOR NEXT