"50 हजार तालांव, 48 तास कोलवाळ जेल", दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या पर्यटकांवर लोबोंनी काढलाय 'जालीम' उपाय!

Goa drunk driving: आमदार मायकल लोबो यांनी गोव्यातील पर्यटनाच्या नावाखाली वाढत चाललेल्या गैरप्रकारांवर कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली
Goa tourism rules
Goa tourism rulesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात दारू पिऊन गाडी चालवण्याचा प्रकार बराच वाढतोय. अनेकवेळा जीव देखील गमावले जातात आणि प्रकारांमध्ये पर्यटकांची नावं देखील समोर येतात. कलंगुटचे आमदार, मंत्री मायकल लोबो यांनी गोव्यातील पर्यटनाच्या नावाखाली वाढत चाललेल्या गैरप्रकारांवर, विशेषत: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या पर्यटकांवर कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे

गोव्याची प्रतिमा खराब होता कामा नये, तसेच दारू पिऊन वाहन चालवण्याचे वाढते प्रमाण एक धोकादायक ट्रेंड बनला आहे, याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, पर्यटक त्यांच्या गाड्या घेऊन येतात किंवा येथे भाड्याने घेतात आणि दारूच्या पूर्ण नशेत वाहन चालवून इतरांसाठी धोका निर्माण करतात.

कठोर कायद्याची आणि ४८ तास तुरुंगवासाची मागणी

या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी, मर्यादित पोलीस दलामुळे पोलिसांकडील मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचे लोबो यांनी निदर्शनास आणून दिले. विशेषत: किनारी पट्ट्यात पोलिसांची संख्या कमी आहे. यावर मात करण्यासाठी त्यांनी सरकारने कठोर कायदा किंवा अध्यादेश त्वरित लागू करण्याची मागणी केली.

लोबो यांनी मुख्यमंत्र्यांना अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्याशी सल्लामसलत करून अभ्यास करण्याचे सुचवले आहे. दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तातडीने ४८ तासांसाठी कोलवाळ जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवले पाहिजे, अशी त्यांची सूचना आहे.

Goa tourism rules
Goa Beaches: 'कोकणीपेक्षा रशियन जास्त, वाळूत बिअरच्या बाटल्या'! गोव्याचे किनारे वाचवा, उपहासात्मक पोस्ट होतेय Viral

५०,००० रुपयांचा दंड आणि 'शिक्षा वाढवा'

लोबो यांनी सुचवलेल्या नियमानुसार, ४८ तासांच्या कोठडीसह दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला ५०,००० चा मोठा दंड आकारला जावा. जर दंड भरला गेला नाही, तर कोठडीचा कालावधी आणखी दोन दिवसांनी वाढवण्याची तरतूद करावी. लोबो यांनी ठामपणे सांगितले की, "असे कठोर उपाय केल्यास कोण दारू पिऊन गाडी चालवतो ते पाहा. मी सांगतो, जर तुरुंगात जावे लागले आणि दंड भरावा लागला, तर कोणताही पर्यटक दारू पिऊन वाहन चालवण्याचे धाडस करणार नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com