Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: मांद्रे मतदारसंघावर मगोचा दावा; 'युती झाली तर जागा आम्हालाच हवी', दीपक ढवळीकरांचे स्पष्ट विधान

MGP BJP Alliance: मांद्रे मतदारसंघात सध्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा (मगो) आमदार आहे, त्यामुळे मांद्रेवर आमचा हक्क आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा/पणजी: मांद्रे मतदारसंघात सध्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा (मगो) आमदार आहे, त्यामुळे मांद्रेवर आमचा हक्क आहे. मगो-भाजप युती झाली तर मांद्रे आमच्यासाठी भाजपने सोडायला हवा. ज्या ठिकाणी आमदार आहे, त्या मतदारसंघात आमचा उमेदवार हा असायलाच हवा, असे ‘मगो’ पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दीपक ढवळीकर यांनी सांगितले.

तसेच माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांनी घरवापसी केली हे चांगले केले. आपण त्यांचे स्वागत करतो, अशीही प्रतिक्रिया दीपक ढवळीकर यांनी दिली. दरम्यान, मांद्रे मतदारसंघात भाजपने जीत आरोलकर यांना उमेदवारी दिली तर त्यांच्यासाठी काम करणार नाही, असे भाजपचे प्रदेश सचिव दयानंद सोपटे यांनी शुक्रवारी पणजीत सांगितले. मांद्रेतच कशाला अन्य कोणत्याही मतदारसंघात भाजपला विजयासाठी अन्य कोणत्याही पक्षांच्या कुबड्यांची गरज नाही, असेही त्यांनी ठणकावले.

मांद्रेतून भाजपने भाजपमधीलच अन्य कोणाला उमेदवारी दिली तर आम्ही सारे त्याच्यासाठी काम करू. पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून वागू; पण अनावश्यकपणे कोणालाही यापुढे पक्षात घेऊन उमेदवारी दिली जाणार असेल तर त्याचे आम्ही काम करणार नाही, यावर ठाम आहे. यापूर्वीही ही भूमिका मांडली होती तीच आताही कायम आहे आणि उद्याही असेल.

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे भाजपमध्ये परत आल्याचा निश्चित आनंद आहे, असे सांगून सोपटे म्हणाले की, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आणि राज्यात डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जनकल्याणासाठी केलेले काम पुरेसे बोलके आहे. त्याच्या जोरावर तीन-चार मतदारसंघ सोडले तर अन्य ठिकाणी भाजपचे उमेदवार अन्य कोणाचीही मदत न घेता निवडणूक येण्यास काहीच हरकत नाही. त्यात मांद्रेचाही समावेश आहे.

राजकारणात संघर्ष असतोच!

राजकारणात संघर्ष हा असतोच, तसा तो पार्सेकर यांच्यासोबत पूर्वी होता. आता आम्ही सारे भाजपसाठी एक झाल्याचे दयानंद सोपटे यांनी नमूद केले. असे असले तरी यापुढे अन्य कोणालाही पक्षाने प्रवेश देत उमेदवारी दिली तर त्याला आमचा नकार असेल. पक्षाच्या नेतृत्वाला आम्ही तसे स्पष्टपणे सांगू, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ Test: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियात मोठा बदल! गुरनूर ब्रारची संघात एन्ट्री, कुलदीप यादव मायदेशी परतणार

Viral Post: LinkedIn ची 'ही' एक सीक्रेट ट्रिक अन् थेट 4 कंपन्यांच्या ऑफर्स! तरुणानं स्मार्ट वर्कच्या जोरावर मिळवली तब्बल 19 लाखांच्या पॅकेजची नोकरी

खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांचा नेमकेपणा

57th IFFI Goa: इफ्फीचा 20 नोव्हेंबरपासून गोव्यात चित्रपटोत्सव; 86 देशांचे 159 आंतरराष्ट्रीय चित्रपट, आयोजनासाठी 30 कोटींचा खर्च

Manipur Violence: मणिपुरात पुन्हा हिंसेचा वणवा! अज्ञात हल्लेखोरांच्या बेछूट गोळीबारात दोन महिलांसह 4 जणांचा मृत्यू; सुरक्षादल सतर्क

SCROLL FOR NEXT