Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: निवडणुकीची तारीख जाहीर होताच मगो 'पत्ते' उघडणार! युती, जागावाटपाचा निर्णय संसदीय समितीकडे

MGP BJP Alliance: पणजी येत्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबतची युती आणि जागावाटपाबाबतचा निर्णय घेण्‍याचे पूर्ण अधिकार मगोच्‍या संसदीय समितीला आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: येत्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबतची युती आणि जागावाटपाबाबतचा निर्णय घेण्‍याचे पूर्ण अधिकार मगोच्‍या संसदीय समितीला आहेत. ही समितीच याबाबत योग्‍य तो निर्णय घेईल आणि निवडणुकीची तारीख जाहीर झाल्‍यानंतरच यावर शिक्‍कामोर्तब होईल, असे मंत्री तथा मगोचे ज्येष्‍ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

येत्‍या विधानसभा निवडणुकीतील भाजप-मगो युती आणि जागावाटप कधीपर्यंत जाहीर होऊ शकते?, असा प्रश्‍‍न पत्रकारांनी केला असता, मगो पक्षाची आमसभा येत्‍या ३१ रोजी होणार आहे. त्‍यानंतर पक्षाच्‍या कार्यकारी समितीची बैठक होईल. या दोन्‍ही बैठकांत भाजपसोबतची युती तसेच जागावाटपाबाबत चर्चा करण्‍यात येईल.

त्‍यानंतर पक्षाच्‍या संसदीय समितीच्‍या बैठकीत अंतिम निर्णय घेऊन तो कार्यकारी समितीकडे पाठवला जाईल. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्‍यानंतर मगो पक्ष युती आणि जागांबाबतची भूमिका स्‍पष्‍ट करेल, असे ढवळीकर म्‍हणाले. मगो पक्षाने सध्‍या १२ मतदारसंघांत काम सुरू केले असून, १७ मतदारसंघांत पक्षाच्‍या समित्‍या आहेत. त्‍यात यावेळचा निवडणूक सर्व्हे मगोसाठी सकारात्‍मक आलेला आहे, असेही ढवळीकर यांनी नमूद केले.

पक्षांतराला आपला कायम विरोधच

आमदारांच्‍या पक्षांतरामुळे गोव्‍याची देशभर बदनामी होत आहे. पक्षांतरास आपण २००० पासून विरोध करत असून, तो कायम असेल, असे मंत्री ढवळीकर म्‍हणाले. आपापल्‍या पक्षांना पुढे न्‍यायचे असेल, तर त्‍या पक्षांनी प्रामाणिक कार्यकर्त्यांना योग्‍य स्‍थान आणि संधी देणे गरजेचे आहे, असे सांगून ढवळीकर यांनी आमदार राजेश फळदेसाई यांनी केलेल्‍या टीकांना उत्तर देणे टाळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रक्षकच भक्षक बनले तर मुलांनी आदर्श कुणाचा घ्यायचा? गोव्यातील घटनांनी व्यवस्था आणि समाजासमोर गंभीर प्रश्न

Surya Gochar 2026: धन आणि समृद्धीचा योग! सूर्यदेवाच्या राशी परिवर्तनाने 5 राशींच्या आयुष्यात येणार आर्थिक स्थिरता आणि भरभराट; भाग्य उजळणार

Goa Politics: मगोच्या 'एकला चलो रे'चा भाजपला मोठा फटका? फोंडा, शिरोड्यासह 5 जागांवर नजर

Naturopathy Treatment: निसर्गाकडे परत चला! औषधांशिवाय निरोगी जीवनासाठी निसर्गोपचाराचे महत्त्व जाणून घ्या

CZMP Finalization: 'सीझेडएमपी' अंतिमतेसाठी सरकारची लगबग, अतिरिक्त माहिती; सूचना सादर करण्यासाठी विविध खात्यांना पत्रे

SCROLL FOR NEXT