Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: गोव्यात 'यलो अलर्ट': पणजीत सर्वाधिक तापमानाची नोंद

Goa Rain Update: हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जाहीर केला असला तरी मंगळवारी पणजीत सर्वाधिक कमाल ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Rain Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत तुरळक पावसाचा शिडकावा पडत आहे. पणजीसह काही भागांत पावसाने हजेरी लावली. पाऊस पडत असला तरी राज्यातील उष्मा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जाहीर केला असला तरी मंगळवारी पणजीत सर्वाधिक कमाल ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावातील कमाल तापमान ३५.४ अंश सेल्सिअस होते.

उष्ण आणि दमट राहणार असून हे तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सियस राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या काळात जाणवणारे तापमान (हिट इंडेक्स) ४० अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यातील विविध भागांत कमाल तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअस होते.

पणजीतील (Panji) किमान तापमान २८ अंश तर मुरगावातील किमान तापमान २७.६ अंश सेल्सिअस होते, अशी माहिती हवामान खात्याने दिली. आज संध्याकाळी खोर्ली, सांताक्रुझ व पणजी परिसरात पडलेल्या पावसामुळे घरी परतणाऱ्या दुचाकीस्वारांचे बरेच हाल झाले.

उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही

राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले असले तरी नागरिकांना (Citizens) काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार समुद्र किनाऱ्यावरील क्रीडा प्रकार टाळावेत, झाडाखाली आसरा घेणे टाळावे, शक्यतो उन्हात फिरू नये, सुती कपडे वापरावेत, उन्हात बाहेर पडताना डोके झाकण्यासाठी टोपी, छत्री किंवा अन्य साधन वापरावीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT