Goa Business Growth Dainik Gomantak
गोवा

Goa Business Growth: गोवा-कर्नाटकांतील उद्योजकांत सामंजस्य करार

Goa Business Growth: तंत्रज्ञानाचे हस्तांतरण: सुविधांची देवाणघेवाण, व्यवसायवृद्धीसाठी एकत्र

दैनिक गोमन्तक

Goa Business Growth:

गोवा आणि किनारी कर्नाटकातील उद्योजक सुविधांची देवाणघेवाण आणि व्यवसायवृद्धीसाठी एकत्र येणार आहेत. एकमेकांच्या प्रदेशात उत्पादीत कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यापासून तंत्रज्ञानाचे हस्तांतरण या क्षेत्रात सहकार्य केले जाणार आहे.

तशा सामंजस्य करारावर मंगळूर येथे गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्रीनिवास घेंपे आणि कनारा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अनंतेश प्रभू यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, समान लक्ष्यासाठी या दोन्ही प्रदेशातील उद्योजक सहकार्य करणार आहेत.

व्यापार उदीम आणि उद्योग क्षेत्राला पूरक असे वातावरण या कराराच्या माध्यमातून तयार केले जाणार आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रतिनिधीत्व कनारा चेंबर करत असल्याने प्रामुख्याने भटकळ ते मंगळूर या टप्प्यातील उद्योजकांना या कराराचा फायदा होणार आहे.

दोन्ही चेंबर्स परस्पर फायद्यासाठी व्यावसायिक संस्था आणि गोवा आणि दक्षिण कन्नड प्रदेशातील आर्थिक, व्यावसायिक आणि वित्तीय संस्था यांच्यातील सहकार्याला प्रोत्साहन देतील. दोन्ही चेंबर यांच्यातील मजबूत संस्थात्मक व्यापार आणि व्यावसायिक संबंध विकसित करण्यासाठी आणि संवाद आणि चर्चेसाठी एक शाश्वत यंत्रणा स्थापन करण्यावर या करारातून सहमती दर्शवली आहे.

सामंजस्य करारानुसार, दोन्ही चेंबर दोन्ही प्रदेशांताल उद्योगांमधील सहकार्य, व्यापार सुलभ करणे, संयुक्त उपक्रम, औद्योगिक सहकार्य, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि इतर प्रकारच्या व्यावसायिक सहकार्यासाठी समर्थन आणि विकास करतील.

विवाद निराकरण केंद्रासाठी सहकार्य
पर्यायी विवाद निराकरण केंद्र स्थापन करण्यासाठी गोवा चेंबरला तांत्रिक कौशल्य आणि सल्लागार सहाय्य देण्यास कनारा चेंबरने करारात सहमती दर्शवली आहे. यात पायाभूत सुविधा सेटअप, ऑपरेशनल फ्रेमवर्क आणि क्षमता-बांधणी उपक्रमांवर मार्गदर्शन समाविष्ट आहे. कार्यक्षम विवाद निराकरण यंत्रणा वाढवणे आणि भागधारकांमध्ये व्यावसायिक सामंजस्य वाढवणे अशी उद्दिष्टे करारात नमूद करण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT