Rotary Club Margao Dainik Gomantak
गोवा

रोटरी क्लबचे सदस्य विश्र्वासास सदैव पात्र - गौरीश धोंड

रोटरी क्लब (Rotary Club) हे जगांमध्ये अनेक देशांमध्ये असुन त्यांचे कोट्यावधी सदस्य आहेत.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा - रोटरी क्लब (Rotary Club) हे जगांमध्ये अनेक देशांमध्ये असुन त्यांचे कोट्यावधी सदस्य आहेत. समाजिक बांधिलकीतुन रोटरी क्लब समाजापयोगी अनेक उपक्रम हाती घेतात. रोटरी क्लबचे सदस्य विश्र्वासास पात्र असल्यानेच ते सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांमध्ये समाजाच्या हिताचे उपक्रम पुर्ण करु शकतात असे रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3170चे गवर्नर गौरीश धोंड (Gaurish Dhond) यांनी सांगितले.(Members of the Rotary Club are always worthy of trust - Gaurish Dhond)

रोटरी क्लब मडगावच्या (Margao) नवोदीत पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण सोहळा आज त्यांच्याहस्ते संपन्न झाला. त्यावेळी  ते बोलत होते. जर माणसाकडे आत्मविश्र्वास असेल तर तो आपल्या इच्छा आकांक्षा पुर्ण करु शकतो असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी रोटरी क्लब कुठले उपक्रम राबवितो व राबवू शकतो याची सविस्तर माहिती त्यानी दिली. प्रत्येक रोटरी क्लबने एक तरी मुलगी दत्तक घ्यावी व तिचा शिक्षणाचा व इतर खर्चाची जबाबदारी घ्यावी असेही त्यांनी सांगितले. 

सद्याच्या परिस्थितीत आरोग्य, पर्यावरण विषयक कित्येक उपक्रम चालु करु शकतात. त्याची यादीच त्यांनी वाचुन दाखवली.या प्रसंगी सहाय्यक गवर्नर आशेष केणी यांचेही भाषण झाले. नवनिर्वाचीत अध्यक्ष मांगिरीश काकोडकर (Mangirish Kakodkar) यांनी रोटरी क्लब मडगावची स्थापना 1963 साली झाली होती. आपण या क्लबचा 59 वा अध्यक्ष आहे. या क्लबच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर संपवली याचा अभिमान वाटतो. सदस्यांनी जो आपल्यावर विश्र्वास दाखवला आहे तो सार्थ करुन दाखविण्याचा आपला प्रयत्न असेल. 2021-22 या काळात रोटरी क्लब मडगावतर्फे अर्थपुर्ण असे  उपक्रम व योजना कार्यान्वित केल्या जातील असे त्यांनी शेवटी सांगितले.

सचिवपदी अनुराग लोहिया (Anurag Lohia) याची निवड करण्यात आली आहे. कार्यकारी समितीतील इतर पदाधिकारी व सदस्य - जगन्नाथ सरदेसाई (खजिनदार), दिलीप प्रभुदेसाई (माजी अध्यक्ष), निरेश नाईक (उपाध्यक्ष),  सुशांत काकोडे (संयुक्त सचिव) अभिषेक लोहिया, प्रशांत कामत, राहुल नायक, चिराग नायक, संजील कुडचडकर, रुपेश माने (पदाधिकारी). विविध समित्यांचे चेअरमन - माघव गुप्ता, प्रसाद चिटणीस, विवेक नायक, कमलजीत साईनी, दत्ता पै रायतुरकर, विनय सावर्डेकर, मुख्तार अमलानी, सुशांत शिरवईकर, शिरीष कामत.

अधिकारग्रहणानंतर आमदार विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांच्या हस्ते मोटरसाईकल पायलटांना हेल्मेट प्रदान करण्यात आली. हा उपक्रम रोटरी क्लबने रेखास हाऊस ऑफ कॉटनचे माघव गुप्ता यांच्या सहकार्याने करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुशांत काकोडे यांनी केले तर सचिव अनुराग लोहिया यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

SCROLL FOR NEXT