Shripad Naik on Contesting Loksabha: लोकसभा निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. त्याची तयारी भाजपकडून सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्र्यांकडून लोकसभा मतदारसंघात दौरे केले जात आहेत. गोव्यातील दोन्ही मतदारसंघातही त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
तथापि, केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत मात्र सर्व आलबेल नसल्याचे समोर येत आहे. कारण, खुद्द उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनीच याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
श्रीपाद नाईक म्हणाले की, भाजपमधीलच काही जणांकडून मला डावलण्याचा प्रयत्न केला जात असून अशा लोकांनी त्यांचे कारस्थान थांबवावे, असा इशारा नाईक यांनी दिला आहे. तसेच उत्तर गोव्यातून भाजपची उमेदवारी मलाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
श्रीपाद नाईक म्हणाले की, पक्षात माझ्या पाठीमागे छुप्या कारवाया केल्या जात आहेत. काहीजणांकडून जाणीवपूर्वक उत्तर गोव्यातील लोकसभेचा उमेदवार बदलणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.
उमेदवार ठरला असल्याचे कुणी सांगत असेल तर ती अफवा आहे. मीच उमेदवार असणार आहे आणि मी माझ्या प्रचाराची सुरवातही केली आहे. निवडणुकीच्या पाच महिने आधी उमेदवार निश्चित्त होईल.
गेल्या काही काळात नाईक यांना वेळोवेळी डावलण्याचा प्रयत्न उघडपणे दिसून आला होता. नवीन झुआरी पुलाचे उद्घाटन, दोना पावला जेटी उद्घाटन कार्यक्रमात श्रीपाद नाईक यांना डावलण्यात आले होते. त्यावरही नाईक यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.