Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

Kokan Railway: कोकण रेल्वे मार्गावर 9, 10 रोजी मेगा ब्लॉक

Kokan Railway: या मेगा ब्लॉक मुळे प्रवासी ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Kokan Railway: कोकण रेल्वे मार्गावर देखभाल व दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने ९ नोव्हेंबर रोजी कुमठा ते भटकळ मार्गावर दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत व १० रोजी रत्नागिरी ते वैभववाडी सकाळी ८.३० ते ११ या वेळेत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगा ब्लॉक मुळे प्रवासी ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

ट्रेन १६५८५ विश्र्वेश्‍वरय्या टर्मिनस बेंगळुरू ते मुरडेश्र्वर. ही गाडी ८ रोजी सुटणार असून ती भटकळपर्यंत धावेल. त्यानंतर भटकळ ते मुरडेश्र्वर प्रवास रद्द करण्यात आला आहे.

ट्रेन १६५८६ मुरडेश्र्वर ते विश्र्वेश्‍वरय्या टर्मिनस बेंगळुरू.या गाडीचा प्रवास ९ रोजी सुरू होणार असला तरी ती मुरडेश्र्वर ऐवजी भटकळहून सुटेल. ट्रेन २२११४ - कोचुवेली ते लोकमान्य टिळक टर्मिनस. ही गाडी ९ रोजी सुटणार असून ती २० मिनिटांसाठी भटकळ स्थानकावर नियमन केले जाईल.

ट्रेन १६३४६ थिरुवनंतपुरम ते टिळक टर्मिनस (नेत्रावती एक्सप्रेस) ही ९ रोजी सुटणार असून तिचे उडुपी ते कणकवली दरम्यान अडीच तासांसाठी नियमन केले जाईल. १०१०६ सावंतवाडी ते दिवा एक्सप्रेस १० रोजी सुटणार असून ३० मिनिटे नियमन केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: नोकऱ्यांचा चोरबाजार! 'त्या' ऑडिओतील मोन्सेरात कोण? महसूलमंत्री संतापले, सखोल चौकशीची केली मागणी

Goa Today's News Live: मंत्री बाबूश यांना माझा पाठिंबा; सर्वच घोटळ्यांची व्हावी न्यायालयीन चौकशी - उत्पल पर्रीकर

Jonty Rhodes: राहण्यासाठी गोवा का निवडला? पर्यटन वादात दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटरने दिलेल्या उत्तराने मने जिंकली

PWD Goa: फक्त एका एक्लिवर मिळणार पिण्याच्या पाण्याचे सर्व अपडेट्स; PDW ची गोवेकरांसाठी नवीन उपाययोजना

Sreejita De: जर्मन नवरा, बंगाली नवरी! प्रसिद्ध अभिनेत्रीने गोव्यात प्रियकरासोबत दुसऱ्यांदा केले लग्न; पाहा Photo

SCROLL FOR NEXT