मोरजी: सद्या सोशल मीडियावर, रेव्होलूशनरी गोवन्स आणि त्यांचे काम गाजत असताना, मांद्रे मतदरसंघांत मात्र फारसे काम दिसत नव्हते. पण काल संध्याकाळी रेव्होलूशनरी गोवन्सच्या कोपरा बैठका मोरजी आणि हरमल येथे झाल्या. यावेळी रेव्होलूशनरी गोवन्सचे नेते, मनोज परब, पेडणे तालुका अध्यक्ष सुनयना गावडे व इतर सदस्य उपस्थित होते. (Meetings of Revolutionary Began in Mandrem constituency)
"मुळ गोवेकरांवर होणाऱ्या अन्यायविरुद्ध लढण्यास रेव्होलूशनरी गोवन्स कायम तयार आहे. पोगो बिल हे गोव्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी एकमेव उपाय आहे. भाजप सरकार हे अतिशय उन्मत्त आणि हेकेकोर झाले आहे. परप्रांतीय मतदारांना खुश ठेवण्यासाठी हे सरकार गोव्याच्या लोकांवर अन्याय करत आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत गोवेकरच यांना घरी बसवतील असा मला ठाम विश्वास आहे", मनोज परब लोकांना संबोधित करताना म्हणाले. यावेळी मोठ्या प्रमाणात गोवेकरांनी पोगो बिलास यांना आपला पाठिंबा दर्शविला व ते विधेयक विधानसभेत संमत करून घ्यावे यासाठी जनजागृती करण्याचे ठरविले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.