Lok Sabha Election Dainik Gomantak
गोवा

Lok Sabha Election: महत्वाची बातमी! लवकरच काँग्रेसचे उमेदवार जाहीर होणार; 'या' चार नावांची दिल्लीत चर्चा!

Lok Sabha Election: गेल्या निवडणुकीत उत्तरेत कॉंग्रेसने दक्षिणेत वास्तव्य करणाऱ्या गिरीश चोडणकर यांना उमेदवारी दिली होती.

Ganeshprasad Gogate

Lok Sabha Election: आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीतील बैठकीत गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार ‘आप’ने काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना पूर्ण पाठिंबा जाहीर केल्याचे काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे राज्य निमंत्रक ॲड.अमित पालेकर यांनी​ सांगितले.

याच संदर्भात एक महत्वाची बातमी हाती येतेय. दिल्लीत मंगळवारी काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक होणार असून या बैठकीत गोव्यातील लोकसभा उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची गोष्ट समोर येतेय.

सुत्रांच्या माहितीनुसार उत्तर गोव्यातून एड.रमाकांत खलप आणि विजय भीके तर दक्षिणेतून फ्रांसीस सार्दीन आणि कॅ.विरिएटो फर्नांडीस या 4 नावांपैकी 2 नावांची होणार अधिकृत घोषणा आहे.

गेल्या निवडणुकीत उत्तरेत कॉंग्रेसने दक्षिणेत वास्तव्य करणाऱ्या गिरीश चोडणकर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांना 38-40 टक्के म्हणजे एक लाख 64 हजार मते मिळाली होती.

उत्तर गोव्यात जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गारूड राहणार असले, तरी भाजपला प्रस्थापित विरोधी मतदानाचा फटका बसू शकतो.

शक्य तितक्या लवकर कॉंग्रेस गोव्यातही आघाडीच्या उमेदवारांची घोषणा करेल. काही पक्ष आम्हांला आघाडीत घेतले नाही, असे म्‍हणत असतील तर ते त्यांचे नक्राश्रू आहेत.

भाजपने अशा काही पक्षांना कॉंग्रेसची मते फोडण्यासाठी मोठे केलेले आहे. राजकारणात हार-जीत होत असते. सत्तेवर आलेला कोणताही पक्ष कायम त्या ठिकाणी राहत नसतो.

जनता हीच सर्वोच्च असते असे मत काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सलमान खुर्शीद यांनी मांडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Barge Sank: समुद्रात असलेल्या जहाजाच्या अवशेषांनी घात केला; मुरगावात लोखंडी प्लेट्सने भरलेल्या बार्जला जलसमाधी, 8 खलाशी बचावले

Shubman Gill Video: 'मी पण पाकिस्तानी फलंदाज नाही...', शुभमन गिलचं सडेतोड उत्तर; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

...अन्यथा मनोहर पर्रीकरांना खोटारडे ठरवा; मंत्री माविन यांच्याविरोधात गोवा सरकार उच्च न्यायालयात जाणार का? चोडणकरांचा सवाल

Goa Live News: गणेश विसर्जनासाठी 'दृष्टी मरीन'चे 47 ठिकाणी जीवरक्षक राहणार तैनात, भक्तांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय

Liquor Seized: गोवा बनावटीचे 35 लिटर मद्य जप्त! अनमोड चेकपोस्टवर कारवाई; कर्नाटकच्या चालकाला अटक

SCROLL FOR NEXT