Meenaskhi Lekhi Goa Visit Twitter
गोवा

Meenaskhi Lekhi Goa Visit: गोव्यात प्राचीन जहाजाची पुनर्बांधणी; ओल्ड गोवा जेटीवर मंत्री मीनाक्षी लेखी यांच्याहस्ते शुभारंभ

नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमारदेखील उपस्थित

Akshay Nirmale

Minister Meenaskhi Lekh Goa Visit: गोव्यात एका जुन्या ऐतिहासिक जहाजाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ परराष्ट्र आणि सांस्कृतिक खात्याच्या राज्य मंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते या उपक्रमाचा ओल्ड गोवा जेटी येथे मंगळवारी, 12 सप्टेंबर रोजी करण्यात आला.

या वेळी नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल उपस्थित होते.

मंत्री लेखी म्हणाल्या की, भारताच्या प्राचीन सागरी व्यापार मार्गांवरून प्रवास करणाऱ्या जहाजांची आठवण करून देणारे स्टिच्ड नौका (the stitched ship) हा देशाचा अमूर्त सांस्कृतिक वारसा आहे.

कदाचित याच्याशी बहुराष्ट्रीय संदर्भ असल्याने याची आपण विक्रीही करू शकू. कारण द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यात या नौकेची मोठी भूमिका होती.

मला खात्री आहे की इतिहासात बरेच चुकीचे घडले आहे, आपल्या संस्कृतीचे नुकसान झाले आहे. ते सर्व दुरुस्त करण्याची वेळ आली आहे, असेही त्या म्हणाल्या.

हे जहाज तयार झाल्यावर भारतीय नौदल प्राचीन नेव्हिगेशन तंत्राचा वापर करून पारंपरिक सागरी व्यापारी मार्गांवरून या जहाजाद्वारे एक अनोखी प्रवास यात्रा करेल. भारतीय नौदल, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि गोव्यातील मेसर्स होडी इनोव्हेशन्स यांच्या संयुक्त सहकार्यातून हे जहाज बांधले जात आहे.

अॅडमिरल हरी कुमार म्हणाले की, "नौदलासाठी, हे जहाज आपल्या देशाला सागराच्या दृष्टीने डोळे उघडायला लावणारे आहे. सागरी चेतना निर्माण करण्यासाठी टाकलेले हे एक पाऊल आहे.

नौदलाचे अधिकारी म्हणाले की, हे जहाज भारताच्या सांस्कृतिक वारशातील एक उल्लेखनीय प्रयत्न आहे. आपल्या देशाच्या समृद्ध जहाज बांधणीच्या वारशाचे ते प्रतीक आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची संकल्पना साकारण्यासाठी विस्तृत संशोधन आणि तज्ज्ञांच्या सल्ला महत्त्वाचा ठरला. 14 डिसेंबर 2022 रोजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय अंमलबजावणी समितीने या प्रकल्पाला मान्यता दिली होती.

भारतीय नौदलाच्या नेव्हल आर्किटेक्चर संचालनालयाने सांस्कृतिक मंत्रालयासोबत केलेल्या अनेक चर्चांनंतर 18 जुलै रोजी मेसर्स होडी इनोव्हेशन्ससोबत प्राचीन जहाजाच्या बांधकामासाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली होती.

या जहाजाच्या स्टिचिंग (शिलाई) चे काम पारंपरिक जहाज चालकांच्या टीमद्वारे केले जाईल. ज्याचे नेतृत्व यातील तज्ज्ञ असलेल्या बाबू शंकरन यांच्या नेतृत्वात केले जाईल.

प्राचीन भारतीय जहाजबांधणी परंपरेप्रमाणे लाकडी फळ्या खिळ्यांच्या साहाय्याने ठोकून ही बोट तयार केली जात होती. प्रत्येक फळी एकमेकांत स्टिच्ड केली जाते. नारळाचे फायबर, राळ आणि फिश ऑईलचे मिश्रण वापरले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT