धक्कादायक! GMC मध्ये महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन; कर्मचारी निलंबित

चौकशीअंती दोषी असल्यास नोकरीवरून टाकणार काढून : आरोग्य मंत्री विश्वजित राणे
Goa Medical College
Goa Medical CollegeDainik Gomantak

Goa Medical College: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच त्यात आणखी एका घटनेमुळे भर पडली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मल्टीटास्किंग कर्मचाऱ्याने (MTS) महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Goa Medical College
Goa Crime News: सांतीनेजमध्ये दिवसाढवळ्या चोरी; फ्लॅटमधून चोरांनी लंपास केले लाखोंचे दागिने

माहितीनुसार, बांबोळीतील वैद्यकीय महाविद्यालयात कामाला असलेला सुमेश होबळे तिथेच काम करत असलेल्या महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करत असल्याचे सांगण्यात येते.

याबाबत त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, महाविद्यालयाचे डीन एस. एम. बांदेकर यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. जर या प्रकरणात तो खरंच दोषी असेल तर त्याला कामावरून काढून टाकण्यात येईल, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले आहे.

जीएमसीमध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित घटनेबाबत चौकशी सुरू आहे. तपासाअंती येणाऱ्या माहितीवरून सुमेश होबळेबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com